यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करा; प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी
By रेवणसिद्ध जवळेकर | Published: March 14, 2023 04:16 PM2023-03-14T16:16:16+5:302023-03-14T16:16:54+5:30
सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार, या शासनाच्या घोषणेवर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
सोलापूर : मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूरच्या आमदारप्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार, या शासनाच्या घोषणेवर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ज्यावेळी आग लागेल, कोणतीही घटना घडेल तर त्यांना मंडळाच्या वतीने नुकसान भरपाई मिळेल, घरकूल मिळेल, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती इत्यादीचा लाभ मिळू शकेल, याबाबत कामगार मंत्री व मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात यावे. कामगारांकरीता कामगार कल्याण मंडळ स्थापन झाले तर सर्व प्रश्न मार्गी लागतील. सद्यस्थितीत कामगारांच्या पूनर्वसन करण्याकरीता त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत अथवा मुख्यमंत्री निधीमधून मदत देण्यात यावी अशी मागणी उद्योग मंत्री यांच्याकडे आ. शिदे यांनी केली.
यासंदर्भात उद्योग मंत्री यांनी सांगितले कि, असंघटीत कामगारांबाबत मंडळ स्थापन करण्याकरीता सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. भविष्यामध्ये सदर कामगारांकरीता सीएसआरमधून काही कारखान्यांचे पैसे कामगारांकरिता वापरण्यात येईल यातून कामगारांना लाभ देण्यात येईल याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.