सोलापूर जिल्ह्यातील सात घरफोड्या उघडकीस; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

By Appasaheb.patil | Published: March 21, 2023 06:22 PM2023-03-21T18:22:56+5:302023-03-21T18:23:21+5:30

चौकशी केली असता, आरोपींनी बार्शी भागातील मौजे भोईंजे, अलीपूर रोड, तावडी, खांडवी, गाडेगांव रोड, वाणी प्लाॅट, सुभाश नगर इत्यादी ठिकाणी मागील १ वर्षापासून त्यांच्या इतर साथिदारांसह घरफोड्या चो-या केल्याचे सांगून गुन्ह्यातील मुद्देमाल काढून दिला आहे.

Seven burglaries in Solapur district revealed Four and a half lakh worth of goods seized | सोलापूर जिल्ह्यातील सात घरफोड्या उघडकीस; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर जिल्ह्यातील सात घरफोड्या उघडकीस; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext


सोलापूर : घरफोडी चोरी करणारा एक अट्टल गुन्हेगार व एक विधीसंघर्ष बालक यांच्याकडून ७ घरफोडी चोरी गुन्ह्यांची उकल करून, ७० ग्रॅम सोन्याचे दागिने, २८० ग्रॅम चांदीसह, ५० हजार रोख रक्कम असा एकूण ४ लाख, १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशाने बार्शी उपविभागात पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते. याच वेळी माळशिरस तालुक्यातील घरफोडी चोरी इत्यादी विविध गुन्ह्यांतील रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार व त्याचा साथीदार हा बार्शी येथील कुर्डुवाडी लातूर बायपास लगत असलेल्या अलीपूर गावच्या शिवारात त्याच्या साथिदारासह थांबला होता. पोलिसांनी त्या घटनास्थळावर नजर मारली असता तेथे दोघे थांबलेले दिसून आले. त्यांच्यावर संशय आल्याने त्या दोघांना ताब्यात घेतले. 

त्यानंतर पोलीय उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचे पथकाने ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी बार्शी भागातील मौजे भोईंजे, अलीपूर रोड, तावडी, खांडवी, गाडेगांव रोड, वाणी प्लाॅट, सुभाश नगर इत्यादी ठिकाणी मागील १ वर्षापासून त्यांच्या इतर साथिदारांसह घरफोड्या चो-या केल्याचे सांगून गुन्ह्यातील मुद्देमाल काढून दिला आहे.
 

Web Title: Seven burglaries in Solapur district revealed Four and a half lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.