गवत्या सापाच्या सात पिल्लांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:44 PM2020-04-15T17:44:41+5:302020-04-15T17:47:43+5:30

सोलापुरातील सोनी नगरात आढळून आला साप; वन्यजीव मित्रांची सतर्कता...

Seven grass snake chicks have received their livelihood | गवत्या सापाच्या सात पिल्लांना मिळाले जीवदान

गवत्या सापाच्या सात पिल्लांना मिळाले जीवदान

googlenewsNext
ठळक मुद्देगवत्या साप हा बिनविषारी असून रंगाने हिरवा असतो. गवत्या सापाचे मुख्य खाद्य बेडूक आहेगवत्या साप हा स्वभावाने शांत जातीचा साप आहे

सोलापूर : विजापूर रोडवर सोनी नगर परिसरात एका व्यक्तीच्या घरात गवत्या सापाची सात पिल्लू आढळून आली़ वन्यजीव प्रेमींनी त्यांची अधिवासात सुखरुप मुक्तता केली़ 
  विजापूर रोडवर सोनी नगर परिसरातील श्रीधर हळ्ळी यांचे घर आहे़ घरात सापाचे पिल्लू निदर्शनास येताच त्यांनी वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य प्रवीण जेऊरे यांच्याशी संपर्क साधला़  वन्यजीव प्रेमी तत्काळ घेटनास्थळी पोहोचले. गवत्या बिनविषारी जातीचे एक पिल्लू आढळून आले. पिल्लाच्या आकारा वरुन हे नुकतेच जन्मलेले असावे याचा अंदाज आला. परंतु हे पिल्लू घरात सापडले होते. कंपाऊंड परिसरात दारा शेजारील साहित्य काढण्यात आले. त्या अडगळीत आणखी सहा गवत्या सापाची पिल्ले आढळून आली.
सर्व सापांच्या पिल्लांना सुरक्षितरित्या पकडुन जवळील त्यांच्या अधिवासमध्ये सुखरूप रित्या सोडण्यात आली. 
 --- 
गवत्या सापाची वैशिष्ट्ये 

 

  • गवत्या साप हा बिनविषारी असून रंगाने हिरवा असतो. 
  • * स्वभावाने शांत जातीचा साप असुन डिवचले असता गळ्या जवळील भाग फुगवितो व * नागा सारखा फना काढण्याची नक्कल करतो व शत्रूला घाबरवितो. 
  • * या सापाचे मुख्य खाद्य बेडुक असुन.
  • * हिरवा रंग असल्याने गवतात सहजासहजी दिसुन येत नाही.
  • * जन्मजात पिल्लांचा रंग हिरवा व त्यावर काळे आडवे पट्टे असतात.
  • * पिल्लांचा डोक्यावर गडद काळा व पिवळसर बाणाच्या टोका प्रमाणे नक्षी असते. 

Web Title: Seven grass snake chicks have received their livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.