धाब्यावर दारू पिणारे सात जण अटकेत; उत्पादन शुल्कची हातभट्ट्यांवरही धाडी
By Appasaheb.patil | Published: May 30, 2023 03:49 PM2023-05-30T15:49:18+5:302023-05-30T15:49:32+5:30
सदर ठिकाणी धाब्याच्या समोरील काऊंटरमध्ये देशी विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावाच्य्या हद्दीतील दोन ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यात २ हॉटेल चालकांसह सात मद्यपी ग्राहकांना अटक करुन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग संदीप कदम यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावाच्या हद्दीत होटेल जयभवानी या ढाब्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणी हॉटेल मालक नवनाथ श्रीरंग रणनवरे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी धाब्याच्या समोरील काऊंटरमध्ये देशी विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या तसेच त्या ठिकाणी चार ग्राहक सोमनाथ पंढरीनाथ पवार, सचिन बाळासो पवार, नाथा आप्पा नरुटे व रंगनाथ गोरख जाधव हे लोक मद्य पितांना आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारु विरोधात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत शुक्रवारी निरिक्षक, सीमा तपासणी नाका, नांदणी यांच्या पथकाने सिताराम तांडा व बक्षी हिप्परगा तांडा ता. दक्षिण सोलापूर परिसरात हातभट्टी दारु भट्ट्यांवर छापे टाकून ३ गुन्हे नोंदविले. ही कारवाई निरीक्षक गुलाब जाधव, दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड यांनी पार पाडली.