मोहोळ तालुक्यातील सात विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:28+5:302021-07-07T04:27:28+5:30
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नाईटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटीव्हीटी अॅन्ड इनोव्हेशन अॅवाॅर्ड २०२० साठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा पार ...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नाईटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटीव्हीटी अॅन्ड इनोव्हेशन अॅवाॅर्ड २०२० साठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा पार पडली. यामध्ये आकाश मधुकर फडतरे, वेदांतराज नवले, सम्राट रणदिवे, गणेश भोई, हर्षवर्धन इंगळे, सुमित शिंदे, पृथ्वीराज लाळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते या मुलांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब फडतरे होते. याप्रसंगी शेजबाभूळगाव येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत यश मिळविलेल्या या विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासूवृत्ती सतत जागृत ठेवून वैज्ञानिक व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी केले आहे.
यावेळी माजी सरपंच नागराज पाटील, सरपंच स्वाती गवळी, उपसरपंच माधवराव पाटील, केंद्रप्रमुख तिपण्णा कमळे, ग्रामसेवक विलास माने, रामचंद्र कांबळे, योगीराज इंगळे, प्रदीप फडतरे, मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, इनोव्हेटिव्ह स्कूलचे रियाज तांबोळी, चंद्रकांत नवले, नेताजी रणदिवे, सागर येळवे, काकासाहेब फडतरे, मोकाशी, विजयकुमार घोंगडे, अशोक रणदिवे उपस्थित होते. अंगणवाडी पर्यवेक्षिका काटोटे आदी उपस्थित होते.
फोटो : ०५ कुरुल १
ओळ: शेजबाभूळगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, विद्यार्थी व शिक्षक वृंद दिसत आहेत.