सेटलमेंटमधील नागरिकांच्या नावे ३१ ऑगस्टपर्यंत सातबारा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मानस

By शीतलकुमार कांबळे | Published: July 6, 2024 05:54 PM2024-07-06T17:54:19+5:302024-07-06T17:54:43+5:30

भटक्या विमुक्तांना घरकुल देण्याचा मानस

Seventeen by August 31 in favor of citizens of the settlement; | सेटलमेंटमधील नागरिकांच्या नावे ३१ ऑगस्टपर्यंत सातबारा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मानस

सेटलमेंटमधील नागरिकांच्या नावे ३१ ऑगस्टपर्यंत सातबारा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मानस

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : सेटलमेंट भागात मोठ्या संख्येने भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना राहतात. या कुटुंबियांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा सातबारा उतारा ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत देण्याचा मानस आहे. या कुटुंबांना याच भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचे घरकुल देणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शहरातील सेटलमेंट ग्राउंड येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, विद्यार्थिंनींना मोफत शिक्षण आदी योजना लागू केल्याबाबत कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य वाटप व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण हा कार्यक्रम झाला. 

यावेळी आमदार सुभाष देशमुख, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे , माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक भारत जाधव, डॉ. सोनाली वळसंगकर आदी उपस्थित होते.

भारत जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाला शासनाने पक्के घरे द्यावीत. तसेच एक ते सहा नंबर कॉलनीत ज्यांची घरे आहेत त्यांना त्या घराचा उतारा द्यावा अशा मागण्या केल्या.

एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

आई प्रतिष्ठान सोलापूर व माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल राज्य शासनाविषयी कृतज्ञता समारंभ संपन्न झाला. तर यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

Web Title: Seventeen by August 31 in favor of citizens of the settlement;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.