सेवालालनगर झाले कोरोनामुक्त; चारवेळा जंतुनाशकाची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:16+5:302021-06-06T04:17:16+5:30
११९ कुटुंब व ६१२ लोकसंख्येचे उत्तर तालुक्यातील सेवालालनगर गाव मागील वर्षी हाकेच्या अंतरावर असलेल्या मार्डी गावात कोरोनाचा उद्रेक झाला ...
११९ कुटुंब व ६१२ लोकसंख्येचे उत्तर तालुक्यातील सेवालालनगर गाव मागील वर्षी हाकेच्या अंतरावर असलेल्या मार्डी गावात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तालुक्यात सर्वाधिक मृत्यूही मार्डीत झाले होते. मात्र लगतच्या सेवालालनगर वाशियांनी कोरोना शिवेबाहेर रोखला होता. यावर्षी सेवालालनगरला कोरोना ने गाठलेच. चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीत कामाला असलेले अनिल व प्रकाश राठोड हे कोरोनाबाधित निघाले. राठोड व वडजे कुटुंबातील एकामागून एक १५ लोक बाधित निघाले. त्यातच ८० वर्षांची सोनाबाई उपचार घेत असताना मयत झाली.
एप्रिल महिन्यात कोरोना चे आलेले संकट गावकऱ्यांनी मनावर घेतले. गावातला कोणी बाहेर जायचे नाही व बाहेरच्याला गावात प्रवेश बंद केला. फारच महत्त्वाचे काम असेल तरच येण्याजाण्यास मोकळीक होती. तीही कोरोनाचे नियन पाळून. यामुळे संपूर्ण मे महिन्यात एकही पाॅझिटिव्ह निघाला नाही. आरोग्य सेविका सुलोचना मठे व आरोग्य सेवक श्रीकांत लोणार यांनी रॅपीड तपासणी व गोळ्याचे वाटप केले.
---
मास्क, सॅनिटायझर व साबन गावात वाटप केले. तीनवेळा रॅपिड टेस्ट केल्या. आशा सेविका कविता पृथ्वीराज राठोड या घरोघरी जाऊन तापमान, पल्स तपासणी करतात.
- कमलाबाई राठोड, सरपंच, सेवालालनगर