झोपेत असलेल्या महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला बेड्या
By विलास जळकोटकर | Updated: April 23, 2024 18:41 IST2024-04-23T18:39:31+5:302024-04-23T18:41:17+5:30
पूर्व भागातील एका नगरामध्ये घरामध्ये झोपेत असलेल्या महिलेशी अश्लील वर्तन करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला.

झोपेत असलेल्या महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला बेड्या
सोलापूर : पूर्व भागातील एका नगरामध्ये घरामध्ये झोपेत असलेल्या महिलेशी अश्लील वर्तन करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पिडित महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे. आकाश उर्फ विश्वनाथ दीपक आलुरे असे या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हिला आपल्या राहत्या घरी झोपलेली होती. मंगळवारच्या पहाटे चारच्या सुमारास नमूद आरोपीने पिडितेशी असभ्य वर्तन केले. पिडिता जागी होताच पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्याद दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, खोमणे, सपोनि कडू यांनी भेट देऊन पिडितेचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात भां. द. वि. ३५४, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदला आहे. तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ करीत आहेत.