शगुफ्ता तांबोळी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:48+5:302021-07-17T04:18:48+5:30

शगुफ्ता तांबोळी यांनी पंढरपूर पंचायत समिती येथील शिक्षणक्षेत्र सांभाळत पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांनी ‘ऑनलाईन शिक्षण सामान्य मूल व ...

Shagufta Tamboli honored with International Award | शगुफ्ता तांबोळी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

शगुफ्ता तांबोळी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

googlenewsNext

शगुफ्ता तांबोळी यांनी पंढरपूर पंचायत समिती येथील शिक्षणक्षेत्र सांभाळत पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांनी ‘ऑनलाईन शिक्षण सामान्य मूल व दिव्यांग मूल’ यावर सखोल अभ्यास करून संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाची दखल युनिर्व्हसिटी टोंगा यांनी घेतली. या संशोधनासाठी आशिया खंडातील ‘इंटरनॅशनल व्हर्म्युअल’ पुरस्कार म्हणजेच ‘शिक्षण व सेवा’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार किंगडम ऑफ टोंगाच्या कुलगुरुंच्या हस्ते गोल्ड मेडल, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन ११ जुलैला नवी दिल्ली येथे डॉ. रिपू राज व प्रियदर्शनी नायक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कमी वयात हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या शिक्षण विभागातील एकमेव महिला आहेत. त्यांना यूएसए शिक्षणासाठी ६ लाख ५० हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली आहे.

कोट ::::::::::::::

मी घेतलेल्या अपार मेहनतीचे या पुरस्कारामुळे फळ मिळाले आहे. आणखी वेगळे काही तरी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

- शगुप्ता तांबोळी

पुरस्कार विजेत्या

फोटो ::::::::::::::::

शगुफ्ता तांबोळी यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करताना डॉ. रिपू राज व प्रियदर्शनी नायक व मान्यवर.

Web Title: Shagufta Tamboli honored with International Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.