शहाजीबापू पाटील यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:09+5:302021-06-29T04:16:09+5:30
या भेटीदरम्यान महुद-विठ्ठलवाडी येथील मरीआईवाले समाजासाठी नवीन समाज मंदिर, रामोशी समाजासाठी सभामंडप, शाही जामा मज्जिद या ठिकाणी ...
या भेटीदरम्यान महुद-विठ्ठलवाडी येथील मरीआईवाले समाजासाठी नवीन समाज मंदिर, रामोशी समाजासाठी सभामंडप, शाही जामा मज्जिद या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मुस्लिम स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण, स्मशानभूमी वॉल कंपाउंडसह सुशोभीकरण, आदी विकासकामे करण्याची मागणी केली. यावेळी आ. शहाजीबापू पाटील यांनी वरील सर्व विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता जगन्नाथ मुळीक यांना दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, माजी सरपंच नवनाथ पाटील, अजित ताटे, अंगद जाधव, ग्रा.पं. सदस्य दिलीप नागणे-पाटील, यशवंत खबाले, संजय चव्हाण, अरुण नागणे, सचिन जाधव, कैलास खबाले, बाबूराव नागणे, आलमगीर मुलाणी, बाळासो इनामदार, अस्लम मुलाणी, अजित मुलाणी, गणेश लवटे, जि. प. बांधकाम उपअभियंता जगन्नाथ मुळीक, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ :::::::::::::::::::
आ. शहाजीबापू पाटील यांनी महूद गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.