शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:54 AM2021-01-13T04:54:27+5:302021-01-13T04:54:27+5:30
पंढरपूर येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा. शिवाजी सावंत बोलत होते. यावेळी सावंत ...
पंढरपूर येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा. शिवाजी सावंत बोलत होते. यावेळी सावंत यांनी आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा रिक्त झाली आहे. यापूर्वी त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा होता. मात्र पुन्हा युती झाली, ती जागा भाजपकडे गेली. भाजपने ती जागा मित्र पक्षाला दिली. त्यामुळे आम्ही आघाडीचा धर्म पाळत दोन पावले मागे घेतली होती. सध्या राज्यात आघाडीचे तीन पक्षांचे सरकार आहे. वेळ कधी बदलेल, काय सांगता येत नाही. पक्ष नेतृत्वाने स्वबळावर लढा, असा आदेश दिल्यास सर्वसामान्य शिवसैनिक तयारच असेल, असेही सावंत यांनी सांगितले.
शैला गोडसे यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष घराघरांत जाऊन वाढविला. त्यांना निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मिळणे गरजेचे असतानाही त्यावेळी त्यांच्यावर अन्याय झाला. आता ही जागा राष्ट्रवादीची असली तरी शिवसेनेने निवडणूक लढवायची तयारी ठेवावी, असेही शिवाजी सावंत म्हणाले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, भैरवनाथचे उपाध्यक्ष अनिल सावंत, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवींद्र मुळे, ग्राहक संरक्षक जिल्हाप्रमुख जयवंत माने, अरुण कोळी, शहर महिला आघाडी प्रमुख पूर्वा पांढरे, उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे, नाना सावतराव, तानाजी मोरे, पंकज डांगे, सिद्धेश्वर कोरे, विनोद कदम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
(वा.प्र.)
फोटो ओळी :::::::::::::::::::::::::
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना शिवेसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, साईनाथ अभंगराव, शैला गोडसे, रवींद्र मुळे, जयवंत माने आदी.