शंभरकर घरीच थांबणार, पंढरपूरच्या यात्रा नियोजनाची जबाबदारी राजेंद्र भोसलेंवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:44 AM2020-06-30T11:44:00+5:302020-06-30T11:50:33+5:30

पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, पोलिस प्रशासन अलर्ट

Shambharkar will stay at home, Rajendra Bhosale is responsible for planning the trip to Pandharpur | शंभरकर घरीच थांबणार, पंढरपूरच्या यात्रा नियोजनाची जबाबदारी राजेंद्र भोसलेंवर

शंभरकर घरीच थांबणार, पंढरपूरच्या यात्रा नियोजनाची जबाबदारी राजेंद्र भोसलेंवर

Next
ठळक मुद्दे- पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाची तयारी पूर्ण- कोरानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन- मंदिर समितीत प्रशासन सज्ज, पोलिस प्रशासन अलर्ट

सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आजारी पडल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरही होम व्कारंटाइन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील यात्रा नियोजनाची जबाबदारी पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. भोसले पंढरपुरात दाखल झाले असून त्यांनी सर्व सुत्रे हाती घेतली आहेत.

पाच महिन्यांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे जिल्हाचा कारभार होता. डॉ. भोसले यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी मिलिंद शंभरकर यांची निुयक्ती करण्यात आली. चार महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा याच कामात गुंतून पडली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंढरपुरात दाखल होत आहेत. या काळातच महापालिका आयुक्त आजारी पडल्याने जिल्हाधिकाºयांना घरात बसून काम करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. या काळात पंढरपूरसाठी एका अनुभवी अधिकाºयाची गरज होती. डॉ. राजेंद्र भोसले यांना पंढरपुरात पाठविण्यात आले आहे.

Web Title: Shambharkar will stay at home, Rajendra Bhosale is responsible for planning the trip to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.