'शंकर'च पहिलं साखर पोतं शंकराच्या चरणी; रणजितसिंह मोहिते पाटलांची पायी वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 04:59 PM2021-02-04T16:59:15+5:302021-02-04T17:09:55+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
माळशिरस : आर्थीक, राजकीय व सामाजिक दृष्टीकोनातुन सर्वसामान्यांचा आधार मानला जाणाऱ्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना अनेक संकटांच्या चक्रव्याहुतून बाहेर पडत सुरू झाला. त्याचे पहिले साखर पोते शिखरशिंगणापूरच्या महादेवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी स्वत चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी अकलूज ते शिखरशिंगणापूर पायी चालत प्रवास केला. एकुणच 'शंकर'च पहिलं साखर पोतं शंकराच्या चरणी अर्पण करून प्रार्थना केली.
कारखान्याचे २७ जानेवारी रोजी मोळी पुजन झाले व १ फेब्रुवारीपासून ऊस गाळप सुरू झाले. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता साखर उत्पादनाला सुरूवात झाली. पहिल्या पाच साखर पोत्यांचे पहाटे ५ : ३० वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पुजन करून पहिले साखरेचे पहिले पोते महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूरच्या शंभु महादेवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी सदाशिवनगर येथील कारखाना स्थळावरून चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पायी चालत जाऊन महादेवाच्या चरणी अर्पण केले. यावेळी चेअरमन आमदार रणजितसिंह मोहीते पाटील यांच्याबरोबर सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील , संचालक सुधाकर पोळ पाटील , सुनील माने आदी उपस्थित होते.