शंतनू गुप्ते यांच्या लज्जतदार पाककृतींची सोलापूरातील सखींना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:31 PM2018-07-10T16:31:03+5:302018-07-10T16:36:15+5:30
आगळीवेगळी ‘किचन सुपर स्टार’ स्पर्धा : लोकमत सखी मंच व बिग बझारचा उपक्रम
सोलापूर : प्रत्येक घरी आपापल्या परंपरेनुसार, रितीरिवाजानुसार पदार्थ बनविले जातात. प्रत्येक राज्याची, प्रांताची स्वत:ची अशी वेगळी ओळख खाद्यपदार्थांमधून निर्माण होत असते. स्त्रियांची हीच पाककलेची आवड ओळखून बिग बझार आणि ‘लोकमत सखी मंच’ने महिलांसाठी ‘किचन सुपर स्टार’ ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती.
बिग बझार येथे ७ जुलैै रोजी दुपारी ३ वाजता कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन नामवंत शेफ शंतनू गुप्ते व बिग बझारचे एएसएम (फूड बझार) चैैतन्य पवार, अक्षय श्रीनिवास, पुणे बिग बझार विभागाचे वभ्ौव तायडे, परीक्षक विद्या हिरेमठ आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत ७५ पेक्षा जास्त सखींनी सहभाग घेतला होता.
गोड आणि तिखट एकापेक्षा एक वेगवेगळ्या स्वादिष्ट पाककृतींची चव या निमित्ताने सखींना चाखायला मिळाली. नामवंत शेफ शंतनू गुप्ते यांच्या लज्जतदार पाककृती या निमित्ताने सखींना शिकवण्यात आल्या.
त्यांनी यावेळी सखींना सोया जिंजर पनीर, कॉर्न प्लेक्स मिक्स भेळ, कॉर्न प्लेक्सचे कटलेट, ओटस्चे लाडू, खजूरचे स्मुदी आदी पदार्थ करायला शिकविले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतानाच स्वयंपाकघरात काम करताना उपयोगी पडतील, अशा भरपूर टिप्सही त्यांनी दिल्या. यावेळी उपस्थित सखींना रेसिपी प्रत देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सखींच्या पदार्थांचे प्राथमिक परीक्षण विद्या हिरेमठ यांनी केले.
त्यानंतर शंतनू गुप्ते यांनी तिखट व गोड पदार्थांमधून निवडण्यात आलेल्या १० रेसिपीज्मधून ७ प्रोत्साहनपर व ३ उत्कृष्ट रेसिपी निवडण्यात आल्या. यावेळी विजेत्यांना बिग बझारतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी सखींना विविध गेम शोच्या माध्यमातून प्रश्न विचारून विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. विविध ठिकाणी पार पडणाºया किचन सुपरस्टार या कार्यक्रमाच्या विजेत्यांमधून लकी ड्रॉ सोडतीद्वारे २५ हजार रुपयांपर्यंतची मोफत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमास सखी मंच सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विजेत्या स्पर्धक
- - प्रथम : वैशाली माने
- - द्वितीय : माया बंगरगी
- - तृतीय : अनिता औसेकर
- - प्रोत्साहनपर : जया तलरेजा, जयश्री भूमकर, अनिता दाबा, आरती वागावकर, सुवर्णा भोसले, सुनीता घारे, किरण चव्हाण.
‘लकी ड्रॉ’मधील विजेत्या स्पर्धक
- - ज्योती गुंड, प्रतिभा पाटील, नाजनीन मुकेरी, जयश्री सदाफुले, अंबू बेरे, शुभांगी कांबळे, सुनीता घाटे, वंदना कोचर, सुरेखा आसबे