शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उद्या सोलापुरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास लावणार हजेरी

By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 17, 2024 06:15 PM2024-07-17T18:15:30+5:302024-07-17T18:15:43+5:30

मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृहात सकाळी साडे दहा वाजता मेळावा होणार आहे.

Sharad Pawar group leader Jayant Patil will attend NCP meeting in Solapur tomorrow | शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उद्या सोलापुरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास लावणार हजेरी

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उद्या सोलापुरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास लावणार हजेरी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा गुरुवार, १८ जुलै रोजी सोलापुरात संवाद मेळावा होणार आहे. या मेळाव्यास शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच माढ्याचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची देखील या वेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष सुधीर खरटमल तसेच प्रदेश उपाध्यक्ष ॲड. यु. एन. बेरिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृहात सकाळी साडे दहा वाजता मेळावा होणार आहे. परिषदेत जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, युवक कार्याध्यक्ष सररफराज शेख, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, महिला कार्याध्यक्ष वंदना भिसे तसेच राहुल बोळकोटे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Sharad Pawar group leader Jayant Patil will attend NCP meeting in Solapur tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.