आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं! शरद पवारांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:58 AM2018-06-13T05:58:54+5:302018-06-13T05:58:54+5:30
शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे.
कुर्डूवाडी (ता़माढा, जि़सोलापूर) - शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे. मी कृषीमंत्री असताना फळबागा लावा, आंब्याची झाडे लावा असे म्हणत होतो. आता आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं, असा मिश्कील टोला खा. शरद पवार यांनी भिडे गुरुजी यांना टोला लगावला.
येथील के. एन. भिसे महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. पवार यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार विनायकराव पाटील यांचा सत्कारही करण्यात आला.
बळीराजा जागृत अन् संघटीत झाला पाहिजे. शेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही, अशी टीका पवार यांनी केली.
संभाजी भिडेंना वाचविण्यासाठी ‘एल्गार’च्या बदनामीचा डाव
मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील दंगलीमागील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करून एल्गार परिषदेला बदनाम केले जात आहे. या अन्यायी कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेण्याबरोबरच मोदी, शहा सरकारविरोधात देशभरातील जनतेला संघटित केले जाईल, असा इशारा निवृत्त न्या. बी.जी. कोळसे-पाटील यांनी मंगळवारी दिला. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी सुधीर धवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, रोना विल्सन व महेश राऊत या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्याच्या निषेधार्थ निवृत्ती न्या. कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘दंगलीतील खरे सूत्रधार असलेल्या भिडे यांच्या अटकेसाठी बहुजनांची अनेक आंदोलने होऊनही पोलीस कारवाई करीत नाहीत.
‘आंबा थिअरी’च्या चौकशीचे आरोग्य संचालकांचे आदेश
नाशिक : शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या मूल होण्यासाठी माझ्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याच्या दाव्याची चौकशी करण्याचे आदेश पुण्यातील आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकेस दिले आहेत. रविवारी वडांगळीकर मठ येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील १८० पेक्षा जास्त आंबे दीडशे जणांना खायला दिले, त्यांना मुलेच झाली, तसेच ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असे विधान केले होते. त्यावर पडसाद उमटले. गणेश बोºहाडे यांनी ‘आंबा थिअरी’विरोधात तक्रार केली होती.
आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं!