शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आज सोलापुरात; शेतकरी मेळाव्याला करणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 10:56 AM2021-02-13T10:56:21+5:302021-02-13T10:57:26+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहून शेतकऱ्याना मार्गदर्शन करणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील कृषिभूषण नानासाहेब काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नव्या वाणाचा लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत होत आहे. दरम्यान, शरद पवार हे हेलिकॉफ्टरने नान्नज येथे आगमन होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित राहून परत ते बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार व पणन मंत्री शामराव पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,आ.बबनदादा शिंदे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख,आ.प्रणिती शिंदे, आ.यशवंत माने, आ. संजयमामा शिंदे,आ.प्रशांत परिचारक, आ. अनिल बाबर, आ. रोहित पवार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजीराव पवार,खजिनदार कैलास भोसले, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, मध्यवर्ती विज्ञान समितीचे चेअरमन अरविंद कांचन, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, माजी आ. अर्जुन खोतकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.