शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द
By राकेश कदम | Published: October 23, 2023 11:46 AM2023-10-23T11:46:12+5:302023-10-23T11:46:38+5:30
शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात शेतकरी मेळावा आणि पंढरपूर शहरात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारचा माढा आणि पंढरपूर तालुक्यातील दौरा अचानक रद्द झाला. महविकास आघाडीच्या मुंबईतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी पवार बारामती हून माढाला येण्याऐवजी मुंबईकडे रवाना झाले अशी माहिती पक्षाचे राज्य निरीक्षक शेखर माने यांनी दिली.
शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात शेतकरी मेळावा आणि पंढरपूर शहरात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार होते. शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी पंढरपूरला जाण्याच्या तयारीत होते. या दरम्यानच शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा आणि पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ही शरद पवारांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली होती. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सोमवारी माढा तालुक्यातील शेतकरी मेळाव्याला येणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापले मेळावे यशस्वी करण्याची चुरस लागली होती. यादरम्यान, शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप आला. माढा तालुक्यातील नेते शरद पवार यांना हा दौरा रद्द करु नये अशी विनवणी करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र पवारांचा दौरा रद्द झाला.
सोमवारचा दौरा झाला असला तरी लवकरच नवी तारीख होईल, असे पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले.