शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:02+5:302020-12-11T04:49:02+5:30

सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुंबईतून थेट प्रक्षेपण होणार आहे. हा कार्यक्रम ...

Sharad Pawar's birthday programs will be telecast live | शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण होणार

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण होणार

Next

सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुंबईतून थेट प्रक्षेपण होणार आहे. हा कार्यक्रम करमाळ्यातील दत्त पेठ येथील दत्तमंदिरात बसून १० फूट बाय २० फूट साइजच्या एलईडी स्क्रीनवर सर्वांना पाहण्याची व्यवस्था केली आहे. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी शहर आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, फ्रंटल व सेलचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी, सदस्य तसेच शरदचंद्र पवारांवर प्रेम करणारे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे संतोष वारे आणि अभिषेक आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी झेडपीचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जगताप, गोवर्धन चवरे, नगरसेवक अतुल फंड, शहराध्यक्ष शिवराज जगताप, विधानसभा अध्यक्ष भोजराज सुरवसे, ओबीसी तालुका अध्यक्ष दत्तात्रय अडसूळ, पदवीधर संघटनेचे नितीन झिंजाडे, लक्ष्मण बुधवंत, कार्याध्यक्ष रवि वळेकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती साखरे, महिला जिल्हा उपाध्यक्षा विजयमाला चवरे, महिला तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, शहराध्यक्षा राजश्री कांबळे, युवा नेते अमीर तांबोळी, मा. युवक तालुका अध्यक्ष आप्पासाहेब आहेरकर, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सर्वेश देवकर, शहराध्यक्ष विवेक लोहार, शहर उपाध्यक्ष केतन कांबळे, महेश काळे पाटील, सचिन नलवडे, श्रीकांत साखरे, युवकचे तालुका उपाध्यक्ष अजय जाधव, प्रदीप बनसोडे, तेजस ढेरे, संजय सरडे, प्रदीप वीर, विकास गायकवाड, धनंजय ढेरे, विशाल पाटील, अनिकेत राखुंडे, मदन बदे, भय्या गोसावी उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Sharad Pawar's birthday programs will be telecast live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.