नवीपेठेच्या प्रश्नावर रंगू लागल्या कविता अन् पेश केली जाऊ लागली शेरो-शायरी !
By Appasaheb.patil | Published: December 19, 2019 04:10 PM2019-12-19T16:10:33+5:302019-12-19T16:18:07+5:30
नव्या पेठेत नेता येत नाही गाडी...मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ?
सोलापूर : नव्या पेठेत नेता येत नाही गाडी़़़मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी...चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी...अशा एक ना अनेक कविता, शेरो-शायरीने नवीपेठेच्या ‘नो व्हेईकल झोन’ बाबत पोलीसांनी घेतलेल्या भूमिकेवर सोशल मिडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
सोलापुरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाºया नवीपेठेत सोमवारपासून सोलापूर शहर पोलीसांनी ‘नो व्हेईकल झोन’ ची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे़ नवीपेठ बाजारात जाणारे सर्वच मार्ग बॅरिगेटस लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीपेठेत एकही दुचाकी अथवा चारचाकी गाडी जात नाही़ या पोलीसांनी घेतलेल्या निर्णयाला व्यापारी, लोकप्रतिनिधी, स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, सोशल मिडियावरही या नो व्हेईकल झोनच्या प्रश्नावर सोशल मिडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत़ एवढेच नव्हे तर या प्रश्नांवरून कविता, शेरो-शायरी करण्यात येत आहेत़ सतीश वैद्य या फेसबुक युजरने नवीपेठेत नेता येत नाही गाडी़़़मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? अशी पोस्ट शेअर केली आहे़ या पोस्ट शेअरनंतर नेटिझन्सकडून विविध कमेंट देण्यात येत आहे.
श्रीनिवास माधवराव वैद्य या युजरने मला समजू नका वेडी़़़चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी असे उत्तर दिले आहे. भाग्यश्री सराफ ने पैठण आणि येवल्याला जाते हो गाडी, चार चाकीत तिची आणि तुमची जोडी, जावे चाखीत थोडी द्राक्षांची गोडी, कारण न सांगता आणावी पैठणी साडी..अशी कमेंट केली आहे़ त्यानंतर चन्नवीर चिट्टे या फेसबुक युजरने पवार साडी सेंटर, चाटी गल्ली, चाटला साडी सेंटर, भवानी पेठ, साड्यांची प्रसिध्द दालने़ उगीच कारण नका सांगू निदान आजच्या तारखेला तरी..ना आणताही साडी घेऊ आपण आयुष्यातली गोडी असे एकापेक्षा एक कविता, शेरो-शायरीने कमेंट बॉक्स हाऊसफुल्ल झाला आहे.
एवढेच नव्हे तर एका फेसबुक युजरने नवीपेठेत करण्यात आलेल्या नो व्हेईकल झोनविरोधात एक पोस्ट शेअर केली आहे़ या पोस्टनंतर नेटिझन्सकडून पोलीस प्रशासनावर टिकेची झोड उठवली आहे.