ती उशीरा आली, आग्रहाखातर नाचली; दबंग गर्लसाठी उन्हात ताटकळले चाहते

By काशिनाथ वाघमारे | Published: October 7, 2023 04:50 PM2023-10-07T16:50:11+5:302023-10-07T16:54:09+5:30

एका चाहत्याने जाता-जाता तिला बुके दिला तर दुस-या चाहत्याला तिने ऑटोग्राफही देत सोलापूरकरांबद्दल आदर व्यक्त केला.

She came late, danced on impulse; Fans for Dabangg Girl in solapur | ती उशीरा आली, आग्रहाखातर नाचली; दबंग गर्लसाठी उन्हात ताटकळले चाहते

ती उशीरा आली, आग्रहाखातर नाचली; दबंग गर्लसाठी उन्हात ताटकळले चाहते

googlenewsNext

सोलापूर : हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री, दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही एका ज्वेलरी दालनाच्या उदघाटनासाठी सोलापुरात येत असल्याचे समजताच तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी ऊन झेलत रस्त्यावर गर्दी केली. ब-याच वेळेनंतर तिचे आगमन झाले आणि चाहत्यांमधली उत्सुकता पाहून ती गाण्यावर नाचली. एका चाहत्याने जाता-जाता तिला बुके दिला तर दुस-या चाहत्याला तिने ऑटोग्राफही देत सोलापूरकरांबद्दल आदर व्यक्त केला.

सोलापूर शहरात व्हीआयपी रोडवर एका नव्या ज्वेलरी दालनाच्या उदघाटनासाठी सोनाक्षी सिन्हा शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी सोलापुरात येत असल्याची वार्ता महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये पसरली. ज्वेलरी दालनाच्या उदघाटनाची वेळ सकाळी ११.३० होती. दहा वाजल्या पासून चाहते या दालनाबाहेर जमायला लागले. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला. दालनाच्या आवरातील सुरक्षेसाठी बाऊन्सरही नेमले. ती दुपारी सव्वा एक वाजता आली.
चात्यांची गर्दी पाहून ती भारावून गेली. निवेदिकासह चाहत्यांनी केलेल्या आग्रहानंतर तिने 'साडी के फॉल पे..' या गाण्यावर दोन मिनीटे नाचली.  

निवेदीकेने उत्सुकता ताणली..
ताटकळत थांबलेल्या चाहत्यांमध्ये उत्सुकता टिकून ठेवण्यासाठी निवेदिकेने तरुणांशी माइकवरून गप्पा मारल्या. सोनाक्षीचा पहिला चित्रपट कोणता ? वडिलांचे नाव काय? त्यांचा फेमस डायलॉग कोणता? असे अनेक प्रश्न करून उत्सुकता ताणून नेली. विश्वसनीय सूत्रानुसार ती आत्ताच प्लेनने निघाली असल्याचे सांगत उत्सुक्ता ताणली.  निवेदीकेने सोनाक्षीच्या गाण्यावर कोणाला डान्स करायचा आहे का ? प्रश्न करताच एक तरुणी पुढे आली. मंचावर येऊन तिने लुंगी डांस.. लुंगी डांस.. या गाण्यावर नृत्य केले

Web Title: She came late, danced on impulse; Fans for Dabangg Girl in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.