शेगावदुमाला, तरटगाव येतील नदीपात्रातून वाळू उपशावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:22+5:302021-08-18T04:28:22+5:30

पंढरपूर : शेगाव दुमाला येथील भीमा नदीपात्रातून व तरटगाव येथील मान नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

Shegavadumala, Taratgaon will take action to remove sand from the river basin | शेगावदुमाला, तरटगाव येतील नदीपात्रातून वाळू उपशावर कारवाई

शेगावदुमाला, तरटगाव येतील नदीपात्रातून वाळू उपशावर कारवाई

Next

पंढरपूर : शेगाव दुमाला येथील भीमा नदीपात्रातून व तरटगाव येथील मान नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत वाळूसह ११ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकरी विक्रम कदम यांच्या पथकाने सोमवारी केली.

तरटगाव (ता. पंढरपूर) येथे राम कृष्णा गडदे यांच्या उसाच्या शेताच्या कडेला रस्त्यावर ट्रॅक्टर चालक अमित औदुंबर क्षीरसागर (वय १९, रा. एकलासपूर, ता पंढरपूर), मालक प्रथमेश सुभाष मोठे (रा. अनवली, ता. पंढरपूर) यांनी संगनमत करून माण नदीपात्रातून बेकायदेशीरपणे उपसा केला. अर्धा ब्रास वाळू एका ट्रक (एम. एच. ०९ बी.सी. १९८०) मधून घेऊन जात असताना तो पोलिसांनी पकडला. या कारवाईत तीन लाख रुपयांचे वाहन व तीन हजारांची अर्धा ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास हवालदार घंटे करीत आहेत.

तसेच शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) गावातील पाण्याच्या टाकीजवळून सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर चालक महेश चंद्रकांत आटकळे (वय २१, रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर) व मालक, तसेच दुसऱ्या ट्रॅक्टरचा चालक गणेश बंडू आटकळे (वय २०, रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर) व मालक हे संगनमत करून भीमा नदीपात्रातून उपसा केला. ही वाळू ट्रॅक्टरमधून घेऊन जात होते. दरम्यान ही कारवाई झाली.

Web Title: Shegavadumala, Taratgaon will take action to remove sand from the river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.