‘शेकाप’ची फसवणूक करणाऱ्यांसोबत युती नाही; स्वबळावर लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:29 AM2021-09-10T04:29:08+5:302021-09-10T04:29:08+5:30

सांगोला शहरातील शेकापच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब देशमुख, तालुका चिटणीस विठ्ठल ...

‘Shekap’ has no alliance with fraudsters; Will fight on its own | ‘शेकाप’ची फसवणूक करणाऱ्यांसोबत युती नाही; स्वबळावर लढविणार

‘शेकाप’ची फसवणूक करणाऱ्यांसोबत युती नाही; स्वबळावर लढविणार

Next

सांगोला शहरातील शेकापच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब देशमुख, तालुका चिटणीस विठ्ठल शिंदे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, डॉ. प्रभाकर माळी, नगरसेवक रफिक तांबोळी, राजू मगर, गोविंद माळी, अवधूत कुमठेकर, औदुंबर सपाटे, बाळासाहेब झपके, डॉ. महेश राऊत, बिरुदेव शिंगाडे, अजित गावडे, बाळासाहेब बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकाप आगामी नगरपरिषद निवडणुकीस सामोरे जात आहे. शेकापच्या दृष्टीने नगरपरिषदेची निवडणूक महत्त्वाची आहे. कार्यकर्त्यांनी जुन्या व नव्यांची मजबूत फळी निर्माण करून निवडणुकीच्या तयारीला लागावे. त्या अनुषंगाने शहरातील शेकापच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. स्व. गणपतराव देशमुख यांनी शहरासाठी भीमा नदीचे पाणी आणून नागरिकांची तहान भागविली आहे, हे विसरुन चालणार नाही. निवडणुकीत उमेदवार जनतेतून दिला जाईल, तो सर्वसमावेशक उमेदवार असेल. शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची आहे. प्रत्येक वाॅर्डात बैठका घ्या, अशा कार्यकर्त्यांना सूचना चंद्रकांत देशमुख यांनी दिल्या. प्रास्ताविक नीलकंठ लिंगे यांनी केले. तर मधुकर कांबळे यांनी आभार मानले.

............

आघाडीमुळेच पक्ष विस्कळीत

स्व.गणपतराव देशमुख यांनी सांगोला शहराचा चौफेर विकास केला आहे. युती, आघाडीमुळे पक्ष विस्कळीत झाला. आघाडीचा विचार सोडून देऊन येणाऱ्या सर्व निवडणुका ताकदीने स्वबळावर लढवूया. शहरात प्रत्येक वाॅर्डात कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करूयात, असे शेकापचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे यांनी सांगितले.

Web Title: ‘Shekap’ has no alliance with fraudsters; Will fight on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.