आसरा अन् शिक्षक सोसायटी केली सील; सोलापुरातील कोरोना बधितांची संख्या घटली...!
By appasaheb.patil | Published: May 12, 2020 07:19 PM2020-05-12T19:19:01+5:302020-05-12T19:22:29+5:30
आज दोघांचा झाला मृत्यू; सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या झाली २७७...!
सोलापूर : सोलापुरातील 'कोरोना' बाधिताची संख्या आता २७७ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या १९ इतकी झाली आहे. आज दोघा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज आसरा सोसायटी आणि शिक्षक सोसायटी येथील प्रत्येकी एका महिलेचा 'कोरोना' चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हा भाग तातडीने सील करण्यात येत आहे.
सोलापुरात आत्तापर्यंत ३४४२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ३२३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात २९५४ निगेटिव्ह तर २७७ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
आज एका दिवसात १३३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३१ निगेटिव्ह तर २ पॉझिटिव्ह अहवाल आले .या दोन्ही महिला आहेत .
कोरोना बाधित मृतांची संख्या सोलापुरात १९ वर पोहोचली आहे. यात ९ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे.
आज दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात एक ५२ वर्षीय महिला रविवार पेठ परिसरातील आहे. ती दिनांक ६ मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. ती ११ मे रोजी रात्री तिचं निधन झालं .
तर दुसरी व्यक्ती शिवाजीनगर मोदी परिसरातील ७१ वर्षीय पुरुष असून ४ मे रोजी ही व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. १२ मे रोजी दुपारी ती मृत पावली.
आत्तापर्यंत रुग्णालयातून ७२ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर १८६ पॉझिटिव्ह रुग्णांवर सोलापुरात उपचार सुरू आहेत.