आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी शिखर बँकेने निवेदेची मुदत वाढवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:33+5:302021-01-08T05:11:33+5:30

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर राज्य शिखर बँकेचे १२८ कोटी रुपयांचे थकीत कर्ज असल्याने राज्य शिखर बँकेने कारखान्याची ...

Shikhar Bank extends the deadline for leasing the Adinath factory | आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी शिखर बँकेने निवेदेची मुदत वाढवली

आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी शिखर बँकेने निवेदेची मुदत वाढवली

Next

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर राज्य शिखर बँकेचे १२८ कोटी रुपयांचे थकीत कर्ज असल्याने राज्य शिखर बँकेने कारखान्याची संपूर्ण मालमत्ता दोन महिन्यांपूर्वी आपल्या ताब्यात घेऊन कर्ज वसुलीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ४ डिसेंंबर २०२० रोजी निविदा काढली होती. निविदा भरण्याची अखेरची मुदत ४ जानेवारी २०२१ पर्यंत होती. राज्य शिखर बँकेने पहिली निविदा रद्द करून पुन्हा नव्याने १ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्धीकरण करून नव्या शर्ती व अटी घालून निविदा मागविल्या आहेत.

तालुक्यात शेलगाव-भाळवणी गावच्या मध्यावर असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती अ‍ॅग्रोमार्फत भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दर्शवली आहे. त्याशिवाय करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदारसंघातील आदिनाथ चालविण्यास घ्यावा, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. शिखर बँकेने निविदा भरण्याची मुदत ११ जानेवारी दिली असून, १२ जानेवारी रोजी निविदा उघडून कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास कोण घेणार? याचा फैसला होणार आहे.

----

Web Title: Shikhar Bank extends the deadline for leasing the Adinath factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.