भाविकांविना यंदा शिखर-शिंगणापूर ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:41+5:302021-03-13T04:40:41+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगणापूर येथील मोठ्या महादेवाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. ...

Shikhar-Shingnapur dew this year without devotees | भाविकांविना यंदा शिखर-शिंगणापूर ओस

भाविकांविना यंदा शिखर-शिंगणापूर ओस

googlenewsNext

छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगणापूर येथील मोठ्या महादेवाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने देवाचे सर्व उत्सव, पूजा साध्या व मोजक्याच लोकांमध्ये साजरा करावी असे आदेश दिले. या बंदी आदेशामुळे मंदिर परिसरातील दीडशे दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले.

महाशिवरात्रीवेळी शिंगणापूर नगरीत मेवामिठाई, बेलफुल, दवना, भस्म, पेढे, हळदी-कुंकू, बुक्का व हॉटेल अशा व्यवसायातून लाखो रूपयांपर्यंतची उलाढाल होत असते. या बंदीमुळे या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपासून शिखर शिंगणापुरात व मंदिरात शुकशुकाट होता.

ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने गावाच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी केल्याने बाहेरील लोकांना गावात प्रवेश दिला नाही.

फोटो लाईन :::::::::::::::::::११पंड०७

शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर भाविकांविना असे ओस पडले असल्याचे दिसत आहे.

Web Title: Shikhar-Shingnapur dew this year without devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.