जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप
By Appasaheb.patil | Published: March 8, 2023 04:02 PM2023-03-08T16:02:25+5:302023-03-08T16:02:49+5:30
नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी १४ मार्च २०२३ पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना व शिक्षक भारतीच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येणार आहे. या संपाचे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) सोलापूर यांना देण्यात आले.
नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्यामुळे हा एकप्रकारे कर्मचाºयांवर अन्याय असून, जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती संघटना आता आक्रमक झाली आहे. आंदोलने, निर्दशने, मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यासाठी सरकारला भाग पाडू असा इशारा शहराध्यक्ष उमेश कल्याणी यांनी लोकमत शी बोलताना दिला. यावेळी सुजितकुमार काटमोरे, सुरेश कनमुसे, रियाजअहमद अत्तार, प्रकाश अतनूर, शाहू बाबर, राजकुमार देवकते, शरद पवार, इक्बाल बागमारू, नौशाद शेख, मायाप्पा हाके, उमेश कल्याणी, किशोरकुमार पोतदार, देव मेटकरी, कांबळे सर, कदम सर आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.