शिंदेंना भाजपातून तर देशमुखांना राष्ट्रवादीतून उमेदवारी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:56+5:302021-03-23T04:23:56+5:30

धनगर समाजाची भूमिका सष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. उषा देशमुख, डॉ. पल्लवी माने, श्रीकांत ...

Shinde should be nominated from BJP and Deshmukh from NCP | शिंदेंना भाजपातून तर देशमुखांना राष्ट्रवादीतून उमेदवारी द्यावी

शिंदेंना भाजपातून तर देशमुखांना राष्ट्रवादीतून उमेदवारी द्यावी

Next

धनगर समाजाची भूमिका सष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. उषा देशमुख, डॉ. पल्लवी माने, श्रीकांत पाटील, माउली हळणवर, पंकज देवकते उपस्थित होते.

डांगे म्हणाले, धनगर समाजाने निवडणूक लढवण्याबाबत काही निर्णय घेतले आहेत. यावेळी यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे, उद्योगपती भाउसाहेब रुपनर, आदित्य फत्तेपूरकर, प्रा. सुभाष माने, माउली हळणवर, डॉ. मारुती टकले, प्रदीप खांडेकर, तानाजी खरात, बापूसाहेब मेटकरी, रविकिरण कोळेकर, प्रा. प्रकाश वनगे आणि संजय माने हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तरीही सर्वानुमते एकच उमेदवार ठरविला जावा, अशी समाजाची भूमिका आहे.

याशिवाय वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांना राष्ट्रवादीने तर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी द्यावी. अशी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

जो राजकीय पक्ष धनगर समाजाचा उमेदवार देईल. त्या उमेदवारास निवडून आणण्याची आमची भूमिका राहील. सध्या वंचित बहुजन आघाडी, मनसे, शेतकरी संघटना, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, एम.आय.एम. व भारत मुक्ती मोर्चा या पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व भारतीय जनता पक्ष यांनी उमेदवारीमध्ये समाजाला डावलले, तर मात्र धनगर समाज स्वस्थ बसणार नाही. निश्चित पद्धतीने वेगळ्या स्वरुपाची भूमिका घेतली जाईल, असे डांगे यांनी सांगितले.

कोट ::::-

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यासाठी धनगर समाजाने माझ्या नावाची शिफारस भाजपच्या नेत्यांकडे केली आहे. भाजपने उमेदवारी दिली तरच ही निवडणूक लढविणार आहे अन्यथा नाही.

- राम शिंदे, माजी मंत्री व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज

कोट ::: -

मला उमेदवारी मिळावी. यासाठी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केली आहे. धनगर समाज एकत्र पाठीशी असेल तर अपक्षदेखील निवडणूक लढवण्यास तयार आहे.

- डॉ. अनिकेत देशमुख

फोटो

२२पंढरपूर-इलेक्शन

ओळी

पंढरपुरात आयाेजित पत्रकार परिषदेत माहिती देताना समाज प्रबोधन मंचचे राज्य प्रमुख प्रा. डॉ. दत्ता डांगे व अन्य पदाधिकारी.

Web Title: Shinde should be nominated from BJP and Deshmukh from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.