सुशीलकुमार शिंदेंना हादरा !

By Admin | Published: May 17, 2014 12:47 AM2014-05-17T00:47:01+5:302014-05-17T00:47:01+5:30

मोदी फॅक्टरने मतदार झाले प्रभावित सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपा पुढे पहिल्या फेरीपासूनच बनसोडेंची आघाडी १३७७८ जणांनी वापरला ‘नोटा’चा अधिकार

Shindeena Shinde | सुशीलकुमार शिंदेंना हादरा !

सुशीलकुमार शिंदेंना हादरा !

googlenewsNext

 

 

 सोलापूर :सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री व संसदेतील सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांना निवडणुकीतील पराभवामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी या मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजयी मिळवून २००४ नंतर पुन्हा एकदा सोलापूर मतदारसंघ भाजपकडे हिसकावून आणला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी सुरुवातीला ना...ना... करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. खरंतर गेल्या वर्षभरापासून सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यानी निवडणूक समोर ठेवून कुठलाही गाजावाजा न करता मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या विजयात सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा ठरला आहे. त्यांच्या प्रचारात सुरुवातीला गती आलीच नाही. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होताच त्यांच्या प्रचारात नवा जोष आला. देशात मोदी फॅक्टर जसा कामी आला तसाच सोलापुरातही बनसोडेंना मोदी फॅक्टरचा मोठा फायदा झाला. बनसोडे हे सावरकरप्रेमी असल्याने हिंदुत्ववाद्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जमले होते. त्यामुळे ते त्यांना आपलेच वाटले. याचाही चांगला फायदा बनसोडेंना झाला. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली होती. सोलापूर जिल्ह्यातील एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांची ओळख मतदारांना आपलीशी वाटली. शिवाय सोशल मीडियामुळे तरुण नवमतदारांना नरेंद्र मोदींविषयी झालेले आकर्षण बनसोडेंच्या विजयात सरस ठरले. इकडे निवडणूक जाहीर होण्याआधीपासून शिंदे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रचारात एकसूत्रीपणा नव्हता. नगरसेवक आपापल्या भागात पदयात्रा काढून आपण प्रचारात सक्रिय असल्याचे दाखवित होते, पण ते किती सक्रिय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. शिंदे आणि काँग्रेसजनांना अतिआत्मविश्वास, ठराविक नेत्यांचा गोतावळा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, एलबीटी आणि शहरातील अतिक्रमण मोहिमेमुळे दुखावलेले व्यापारी व नागरिक या गोष्टींशिवाय ‘शिंदेंनी काय विकास साधला?’ असा विरोधकांनी दिलेला नारा या गोष्टी शिंदेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्या गेल्या.शंकर जाधव ल्ल सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री व संसदेतील सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांना निवडणुकीतील पराभवामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी या मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजयी मिळवून २००४ नंतर पुन्हा एकदा सोलापूर मतदारसंघ भाजपकडे हिसकावून आणला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी सुरुवातीला ना...ना... करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. खरंतर गेल्या वर्षभरापासून सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यानी निवडणूक समोर ठेवून कुठलाही गाजावाजा न करता मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या विजयात सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा ठरला आहे. त्यांच्या प्रचारात सुरुवातीला गती आलीच नाही. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होताच त्यांच्या प्रचारात नवा जोष आला. देशात मोदी फॅक्टर जसा कामी आला तसाच सोलापुरातही बनसोडेंना मोदी फॅक्टरचा मोठा फायदा झाला. बनसोडे हे सावरकरप्रेमी असल्याने हिंदुत्ववाद्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जमले होते. त्यामुळे ते त्यांना आपलेच वाटले. याचाही चांगला फायदा बनसोडेंना झाला. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली होती. सोलापूर जिल्ह्यातील एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांची ओळख मतदारांना आपलीशी वाटली. शिवाय सोशल मीडियामुळे तरुण नवमतदारांना नरेंद्र मोदींविषयी झालेले आकर्षण बनसोडेंच्या विजयात सरस ठरले. इकडे निवडणूक जाहीर होण्याआधीपासून शिंदे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रचारात एकसूत्रीपणा नव्हता. नगरसेवक आपापल्या भागात पदयात्रा काढून आपण प्रचारात सक्रिय असल्याचे दाखवित होते, पण ते किती सक्रिय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. शिंदे आणि काँग्रेसजनांना अतिआत्मविश्वास, ठराविक नेत्यांचा गोतावळा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, एलबीटी आणि शहरातील अतिक्रमण मोहिमेमुळे दुखावलेले व्यापारी व नागरिक या गोष्टींशिवाय ‘शिंदेंनी काय विकास साधला?’ असा विरोधकांनी दिलेला नारा या गोष्टी शिंदेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्या गेल्या.शंकर जाधव ल्ल सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री व संसदेतील सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांना निवडणुकीतील पराभवामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी या मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजयी मिळवून २००४ नंतर पुन्हा एकदा सोलापूर मतदारसंघ भाजपकडे हिसकावून आणला आहे. भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी सुरुवातीला ना...ना... करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. खरंतर गेल्या वर्षभरापासून सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यानी निवडणूक समोर ठेवून कुठलाही गाजावाजा न करता मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या विजयात सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा ठरला आहे. त्यांच्या प्रचारात सुरुवातीला गती आलीच नाही. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होताच त्यांच्या प्रचारात नवा जोष आला. देशात मोदी फॅक्टर जसा कामी आला तसाच सोलापुरातही बनसोडेंना मोदी फॅक्टरचा मोठा फायदा झाला. बनसोडे हे सावरकरप्रेमी असल्याने हिंदुत्ववाद्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जमले होते. त्यामुळे ते त्यांना आपलेच वाटले. याचाही चांगला फायदा बनसोडेंना झाला. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली होती. सोलापूर जिल्ह्यातील एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांची ओळख मतदारांना आपलीशी वाटली. शिवाय सोशल मीडियामुळे तरुण नवमतदारांना नरेंद्र मोदींविषयी झालेले आकर्षण बनसोडेंच्या विजयात सरस ठरले. इकडे निवडणूक जाहीर होण्याआधीपासून शिंदे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रचारात एकसूत्रीपणा नव्हता. नगरसेवक आपापल्या भागात पदयात्रा काढून आपण प्रचारात सक्रिय असल्याचे दाखवित होते, पण ते किती सक्रिय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. शिंदे आणि काँग्रेसजनांना अतिआत्मविश्वास, ठराविक नेत्यांचा गोतावळा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, एलबीटी आणि शहरातील अतिक्रमण मोहिमेमुळे दुखावलेले व्यापारी व नागरिक या गोष्टींशिवाय ‘शिंदेंनी काय विकास साधला?’ असा विरोधकांनी दिलेला नारा या गोष्टी शिंदेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्या गेल्या.

 

---------------------------------------------

 

या कारणांमुळे मिळाला विजय अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारार्थ भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मोठी जाहीर सभा झाली. या सभेचा मोठा फायदा त्यांना झाला. शिवाय नरेंद्र मोदींची तरुणांमध्ये निर्माण झालेली क्रेज याचा मोठा फायदा एलबीटीमुळे सोलापुरातील व्यापार्‍यांमध्ये मोठा संताप आहे. त्यातच सोलापुरात अतिक्रमण मोहीम तीव्र झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि व्यापार्‍यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. शिंदेंवरील या नाराजीचा फायदा बनसोडेंना झाला महायुतीत भाजपसह शिवसेना, रिपाइं, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होते. या महायुतीचा बनसोडेंना फायदा झाला. शिवाय चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रात वावरल्याने जिल्ह्यातील एक अभिनेता म्हणून त्यांची झालेली ओळख याचा फायदाही बनसोडेंना झाला.

 

---------------------------------

 

जिंकल्याचे कारण नरेंद्र मोदींची झालेली जंगी जाहीर सभा सावरकरप्रेमी आणि मितभाषी अभिनेता आणि चित्रपट निर्मितीत योगदान शिंदे यांच्यावरील नाराजी

 

---------------------------------

 

हरल्याचे कारण ठराविक नेत्यांचा गोतावळा उपसा सिंचन योजनांच्या निधीसाठी कानाडोळा एलबीटी आणि अतिक्रमण मोहिमेचा संताप नेत्यांना अतिआत्मविश्वास 

Web Title: Shindeena Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.