शिंगणापूरनगरी पोलिसांनी गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:45+5:302021-04-22T04:22:45+5:30
शिंगणापूर येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर ...
शिंगणापूर येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर यात्रेच्या काळात भाविकांनी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती पाटील यांनी दिली. यावेळी माणचे प्रातांधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख, पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सपोनि राजकुमार भुजबळ यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान समितीचे प्रमुख उपस्थित होते.
शासन आदेशानुसार शिंगणापूर यात्रा रद्द केली असून, १७ ते २७ एप्रिल या कालावधीत शिंगणापुरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यात्रा काळात रूढी परंपरेनुसार शंभू महादेव दर्शनासाठी भाविक काठी, कावडी घेऊन येऊ नयेत यासाठी शिंगणापुरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मंदिराकडे डोंगर पायवाटेने येणाऱ्या भाविकांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी ड्रोन कॅमेरे, तसेच दुर्बिणीतून करडी नजर ठेवण्यात येत आहे.
तैनात केलेला फौजफाटा
शिंगणापूर यात्रेत २३ व २४ एप्रिल मुख्य दिवस असून, भाविकांनी शिंगणापूर नगरीत प्रवेश करू नये यासाठी एक पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस आधिकारी, ७० पोलीस कर्मचारी, ४० होमगार्ड, ३ दंगल नियंत्रण पथके, असा फौजफाटा तैनात केला आहे. मुंगी घाट परिसरासह चारही मार्गांवर चार ड्रोन कमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शिंगणापूर यात्रा कालावधीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती धीरज पाटील यांनी दिली.
फोटो ::::::::::::::::::
शिंगणापूर मंदिर परिसराभोवती पोलीस छावणीचे स्वरूप.