शिराळ (टें) ग्रामपंचायतीवर ढेकणे गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:32+5:302021-01-19T04:24:32+5:30
टेंभुर्णी : माढा तालुक्यातील शिराळ (टें) येथे बाळासाहेब ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे सहा सदस्य निवडून आले. ढेकणे ...
टेंभुर्णी : माढा तालुक्यातील शिराळ (टें) येथे बाळासाहेब ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे सहा सदस्य निवडून आले. ढेकणे गटाने शिराळ (टें) ग्रामपंचायतची सलग तीनवेळा सत्ता काबीज करून विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
माढा शिराळ (टें) येथे अत्यंत चुरसीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ढेकणे गटाचे अश्विनी बाळासाहेब ढेकणे, समाधान मोतीलाल लोकरे, संतोष हनुमंत केंदळे, दत्तात्रय लाला कसबे, द्रौपदी जोतिराम लोकरे, संगीता ज्ञानदेव सुतार हे सदस्य १५९ मताधिक्याने निवडून आले आहेत. विरोधी ताठे-देशमुख गटाचे रावसाहेब हनुमंत ताठे, संजय सदाशिव भानवसे, सुलन कृष्णा लोकरे हे तीन सदस्य निवडून आले.
या विजयासाठी बाळासाहेब ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण लोकरे,महादेव पवार, पोपट लोकरे, सिद्धेश्वर चव्हाण, दिगंबर जगताप, अजिनाथ झिंगे, अंकुश भानवसे, उत्तम पाटील, अशोक भानवसे, मोतीलाल लोकरे, नवनाथ जगताप, सोपान लोकरे, लक्ष्मण भानवसे, अरुण भानवसे, प्रताप लोकरे, भानुदास मुळे यांनी विजयासाठी सामूहिक प्रयत्न केला. विजयी उमेदवारांचा बाळासाहेब ढेकणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.