शिरीष ताटे तीन महिन्यासाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:29+5:302021-02-14T04:21:29+5:30
बार्शी : शहरातून तडीपार असलेला शिरीष धनंजय ताटे यास सोलापूर जिल्ह्यातून तीन महिन्याकरिता तडीपार करण्याचा आदेश ...
बार्शी : शहरातून तडीपार असलेला शिरीष धनंजय ताटे यास सोलापूर जिल्ह्यातून तीन महिन्याकरिता तडीपार करण्याचा आदेश पाेलीस अधीक्षकांनी काढला आहे. शहरातून त्यास जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात आले. याबरोबरच शहरात अवैध धंदे करणाऱ्या १७ जणांविरोधात दोन जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव ग्रामीण सोलापूर पेालीस अधीक्षक याच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.
आदेश प्राप्त होताच शिरीष ताटे याला जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात आले.
याशिवाय रोहित लाकाळ (वय २६), प्रेम लाकाळ (वय ३०), आकाश लाकाळ (वय२७), सागर लाकाळ (वय २८), विजय माने (वय २८, सर्व रा.पाटील चाळ, बार्शी) तर अवैध व्यवसाय करणारे सोमनाथ पिसे (वय५१, सुभाष नगर), हरिदास सुतार (वय ५३, रा. बार्शी), नाना कांबळे (वय५८, रा. सोलापूर रोड), सुधीर काकडे (वय ५७, उपळाई रोड), भगवान राऊत (वय ७०, सोलापूर रोड), अरुण म्हातेकर (वय ६८, मंगळवार पेठ), प्रकाश शिंदे (वय ५८, सुतार नेट) ,धवल बदाले (वय २८, कापसे बोळ), राहुल घोंगडे (वय २१, रा. धारूरकर बोळ, राऊळ गल्ली), अनंत वाघ ( वय ४२, नाळे प्लॉट), इरफान शैख (वय ३२, रा. रिंग रोड), गुरुलिंग घोडके (वय ४४, पंकज नगर) यांच्या विरुद्ध सोलापूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.