सोलापुरातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शरणप्पा तोरवी यांचे निधन
By Appasaheb.patil | Published: February 20, 2023 06:44 PM2023-02-20T18:44:16+5:302023-02-20T18:45:11+5:30
उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि सोलापूर जिल्हा खोखो असोसिएशनच्या प्रचार व प्रसारात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खोखो संघटक शरणप्पा मल्लप्पा तोरवी (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व एक मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी रूपाभवानी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि सोलापूर जिल्हा खोखो असोसिएशनच्या प्रचार व प्रसारात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खासदार शरद पवार महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांनी सरचिटणीस व कार्याध्यक्ष ही महत्वाची पदे भूषविली होती. खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून राज्यभरात खो-खो चा प्रचार, प्रसार अन् खो-खो खेळाविषयीची जनजागृती करण्याचे काम तोरवी यांनी प्रामाणिकपणे केले होते. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गर्शनाखाली सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक खो-खो खेळाडूंनी विविध पातळीवर नाव चमकाविले आहे.