भाजप नेते मारहाणप्रकरणी शिवसैनिकांना अटक<bha>;</bha> जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:24+5:302021-02-09T04:25:24+5:30

भाजपतर्फे पंढरपूर येथील महावितरणच्या गेटच्या बाहेर आंदोलनादरम्यान शिरीष वल्लभ कटेकर यांनी मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा राग मनात ...

Shiv Sainiks arrested in BJP leader's assault case, granted bail | भाजप नेते मारहाणप्रकरणी शिवसैनिकांना अटक<bha>;</bha> जामीन मंजूर

भाजप नेते मारहाणप्रकरणी शिवसैनिकांना अटक<bha>;</bha> जामीन मंजूर

Next

भाजपतर्फे पंढरपूर येथील महावितरणच्या गेटच्या बाहेर आंदोलनादरम्यान शिरीष वल्लभ कटेकर यांनी मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा राग मनात धरून संदीप केंदळे, बाळू देवकर, रवि मुळे, सुधीर अभंगराव, जयवंत माने, वनारे, बुरांडे (सर्व रा. पंढरपूर) यांच्यासह अज्ञात २० ते २५ लोकांनी शिरीष वल्लभ कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले तसेच गळ्यामध्ये बांगड्याची माळ टाकून डोक्यावर साडी टाकली.

तेव्हा काही कार्यकर्त्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्या कार्यकर्त्यांपैकी एक जण कुकरी घेऊन ये, याला आता संपवून टाकू असे मोठ्याने म्हणाला, अशी तक्रार कटेकर यांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुरनं ८९/२०२१ भादंवि कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०० सहा. महा. पोलीस कायदा कमल १३५ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण पवार करीत आहेत.

यांना अटक व जामीन मंजूर

रवींद्र यशवंत मुळे (रा. उत्पातगल्ली), सुधीर नारायण अभंगराव (रा. जुनीपेठ, कोळी गल्ली), जयवंत मोहनराव माने (रा. ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, भोसले चौक), विनायक शंकर वनारे (रा. गुरुदेवनगर, सांगोला रोड), लंकेश काकासाहेब बुराडे (रा. गाताडे प्लाॅट), संदीप सुरेश केंदळे (रा. संतपेठ), बाळासाहेब मोहन देवकर (रा. जुनी पेठ), सचिन सुरेश बंदपट्टे (रा. भक्ती मार्ग), समाधान पांडुरंग अधटराव (रा. हरिदास वेस), सिद्धनाथ औदुंबर कोरे (रा. गौतम विद्यालय), सूरज रमेश गायकवाड (रा. महावीरनगर), अविनाश मारुती वाळके (रा. शिंदेनगर), पंकज राजाराम डांगे (रा.जुनी पेठ कोळी गल्ली), अरुण दिगंबर कांबळे (गोविंदपुरा), तानाजी मोहन मोरे (रा.छत्रपती शिवाजी चौक), बाबासाहेब बाबूराव अभंगराव (रा.जुनी पेठ कोळी गल्ली), ईश्वर रघुनाथ साळुंखे (रा. महाराणा प्रताप चौक, सेंन्ट्रल नाक्याशेजारी) या सर्वांना सोमवारी सकाळी १०.३०च्या सुमारास अटक केली. वरील सर्वांना दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांचा जमीन मंजूर केला आहे.

फोटो ओळी : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यासाठी घेऊन जाताना पोलीस.

Web Title: Shiv Sainiks arrested in BJP leader's assault case, granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.