नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:09+5:302021-07-31T04:23:09+5:30
यावेळी महावीर देशमुख यांच्यावर ग्रामीण भागातील पक्ष संघटन वाढविण्याची जबाबदारी सोपविली आहे. शिवाय कोरोना काळात राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ...
यावेळी महावीर देशमुख यांच्यावर ग्रामीण भागातील पक्ष संघटन वाढविण्याची जबाबदारी सोपविली आहे. शिवाय कोरोना काळात राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना स्वस्त धान्य मिळाले का?,आधार कार्ड नसेल तर ते काढण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य, मार्गदर्शन करणे, गावातील प्रमुख समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आदी मुद्दे घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी नागरिकांमध्ये जात आहेत. शिवसेनेच्या या अभियानामुळे येणाऱ्या झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुका प्रमुख महावीर देशमुख, भगवान जमदाडे, विभाग प्रमुख प्रशांत जाधव, गटप्रमुख शुभम चव्हाण, शाखा प्रमुख विलास कोरके, सुहास तळेकर, महेश सुरवसे, नागनाथ सुरवसे, उमेश घोडके, पांडुरंग सावंत, कुमार शेळके, नागनाथ माळी आदी उपस्थित होते.
फोटो ::::::::::::::
शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी संभाजी शिंदे, महावीर देशमुख, भगवान जमदाडे, प्रशांत जाधव आदी.