अकलूजचे उंबरठे झिजविणाºया अन् अनगरच्या वाड्यावर जाणाºया शिवसैनिकांना सावंतांचा टोला, ‘असले शंभर मालक विकत घेईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:33 PM2019-08-05T13:33:41+5:302019-08-05T13:42:15+5:30

करमाळा, मोहोळ शिवसैनिकांच्या मेळाव्यात भरला दम : व्यासपीठावर बसणाºयांनीच केला आतापर्यंत मोहभंग

The Shiv Senais, who go to the palace of Akalooj and go to the fence of Ungar, will buy a hundred pieces of masters, | अकलूजचे उंबरठे झिजविणाºया अन् अनगरच्या वाड्यावर जाणाºया शिवसैनिकांना सावंतांचा टोला, ‘असले शंभर मालक विकत घेईन’

अकलूजचे उंबरठे झिजविणाºया अन् अनगरच्या वाड्यावर जाणाºया शिवसैनिकांना सावंतांचा टोला, ‘असले शंभर मालक विकत घेईन’

Next
ठळक मुद्दे- मोहोळ येथील घाटुळे मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा- जलसंधारणमंत्री तानाजी सावंत सोलापूर जिल्हा दौºयावर

मोहोळ :  शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचे पाणी करतो, आम्ही मार खातो असे म्हणायचे आणि अंधारात वाड्यावर जाऊन मालकाचे पाय धरायचे अशा मंडळींना मी ओळखले आहे. मी कुठल्या मालकाला घाबरणारा नाही, असले शंभर मालक विकत घेणारा आहे असा हल्ला जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी लगावला.

येथील घाटुळे मंगल कार्यालयात मोहोळ तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित  केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी  व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, नगरसेवक मनोज शेजवाल, सेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले,  काकासाहेब देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख , तालुका उपप्रमुख नागेश वनकळसे, झेडपी सदस्या शैला गोडसे, जिल्हा उपप्रमुख चरणराज चवरे, दादा पवार, नगरसेविका सीमा पाटील, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, राजरत्न गायकवाड,  पंचायत समिती सदस्या सुनीता भोसले मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील सच्चा आणि कडव्या शिवसैनिकांचा आजपर्यंत स्टेजवर बसणाºयांनीच अपेक्षाभंग केला आहे. यापुढे मी आता खपवून घेणार नाही.  त्यामुळे शिवसैनिकांनो तुम्ही तुमची जागा सोडू नका. मला कुणी भुरळ घालू नका. या ठिकाणचा उमेदवार यापुढे आता समोर बसलेले शिवसैनिकच ठरवतील. भविष्यात पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करणाºयांना सोडणार नाही. 

विधानसभेच्या निवडणुकीनंतर मीच मंत्री असणार आहे. त्यामुळे गद्दारी करणाºयांना मतदारसंघ सोडून जावे लागेल, असा इशारा दिला. सेनेत आता एकच गट म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल असे सांगितले.  यावेळी तालुका उपप्रमुख किरण वाघमोडे, दिलीप टेकाळे, दादा करणावर, तात्या धावणे, वाहतूक सेनेचे सोमनाथ पवार महेश दोडके, हर्षल देशमुख, सत्यवान देशमुख, चंद्रकांत गोडसे, सोमनाथ आखाडे, किशोर वाघचवरे, गणेश झेंडगे, भागवत मुळे, सचिन सुरवसे, शिवाजी पासले यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना सोडून जाणारे आताच जा
- मला यापूर्वीच्या संपर्कप्रमुखासारखे  समजू नका. मी तिकीट विकणार नाही. मी मास्तर आहे, प्रगती पुस्तक बघूनच काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही काम करत रहा. ज्याचे काम चांगले असेल त्यालाच निश्चित उमेदवारी मिळेल. शिवसेना सोडून जाण्याची भाषा वापरणाºयांनी आताच स्टेज सोडून निघून जावे, असा इशारा सेनेचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिला.

Web Title: The Shiv Senais, who go to the palace of Akalooj and go to the fence of Ungar, will buy a hundred pieces of masters,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.