भालकेंच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा; पक्षाचे संपर्क कार्यालयही सुरू, स्वबळावर लढण्याचीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 16:44 IST2021-01-10T16:44:27+5:302021-01-10T16:44:36+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

भालकेंच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा; पक्षाचे संपर्क कार्यालयही सुरू, स्वबळावर लढण्याचीही तयारी
पंढरपूर : पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाची विधानसभेची रिक्त जागेची निवडणूक समोर ठेऊन पंढरपूर येथे शिवसेनेचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच ही जागा शिवसेनेकडेच होती असे वक्तव्य शिवाजी सावंत यांनी केले आहे. यामुळे पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाची विधानसभेच्या जागेवरून शिवसेना व राष्ट्रवादीत वाद रांगणार आहे.
पंढरपूर येथे शिवसेनेचे महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपूर येथे महिला आघाडी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी शिवाजी सावंत बोलत होते.
सावंत पुढे म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा होता. पुन्हा युती झाली ही जागा भाजपाकडे गेली. सध्या राज्यात तीन पक्षाच सरकार आहे. हे राजकारण आहे. वेळ कधी बदलेल काय सांगता येत नाही, स्वबळावर लढावं लागलं तर शिवसैनिक तयारच असतो, असे शिवाजी सावंत यांनी सांगितले.
त्याचबरोबर मागील निवडणुकीत शैला गोडसे यांच्यावर आन्याय झाला आहे. पंढरपूर - मंगळवेढा ही जागा राष्ट्रवादीची असली तरी निवडणूक लढवायची तयारी ठेवायची असे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेत वाद होणार हे निश्चित झाले आहे.