सोलापूर जिल्ह्यातील थकीत एफआरपीसाठी शिवसेनेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:38 AM2020-12-15T04:38:45+5:302020-12-15T04:38:45+5:30
दरम्यान, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शिवसेना नेत्यांशी चर्चा करून याबाबत त्वरित मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेचे नागेश ...
दरम्यान, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शिवसेना नेत्यांशी चर्चा करून याबाबत त्वरित मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेचे नागेश वनकळसे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात मोहोळ तालुका शिवसेनाप्रमुख अशोक भोसले, विद्यार्थी सेनेचे हर्षल देशमुख, प्रवक्ते बाळासाहेब वाघमोडे, नाना भोसले, गणेश लखदिवे आदी सहभागी झाले होते. प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या आंदोलनाची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तात्काळ दखल घेऊन आंदोलकांच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले.
यावेळी शिष्टमंडळाने सी रंगनाथन समितीच्या अहवालानुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नापैकी ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची उसाची एफआरपी त्वरित शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत, कारखान्याला ऊस गेल्यापासून १४ दिवसात उसाच्या एफआरपीची रकम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी, कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्यावे, शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षापासूनची थकीत ऊस बिले त्वरित मिळवून द्यावीत, कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन करावेत आदी मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, उत्तम इंदलकर, साखर सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले, मंगेश तिटकारे, राजेश सुरवसे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : साखर संकुलासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, नागेश
वनकळसे, बाळासाहेब गायकवाड आदी.
--
===Photopath===
141220\14sol_1_14122020_4.jpg
===Caption===
साखर संकुलासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करताना शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, नागेश वनकळसे, बाळासाहेब गायकवाड आदी.