शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:10+5:302021-03-27T04:23:10+5:30

शैला गोडसे यांनी मंगळवेढा आणि पंढरपूर शहरात बैलगाडीतून रॅली काढत दोन्ही शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत दुपारी आपला ...

Shiv Sena's Shaila Godse revolted and filed her candidature | शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला

शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला

googlenewsNext

शैला गोडसे यांनी मंगळवेढा आणि पंढरपूर शहरात बैलगाडीतून रॅली काढत दोन्ही शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत दुपारी आपला अर्ज दाखल केला. मागील वेळीही आपण शिवसेनेकडून निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. मात्र युतीमुळे ही जागा मित्रपक्षाला सोडण्यात आली. पक्ष आदेश मानत आपण त्यावेळी माघार घेतली होती. मात्र आता पक्षाने जरी सांगितले तरी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सांगत त्या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

गेल्या चार वर्षांपासून आपण सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न घेऊन लढत आहोत. त्यामुळे जनतेतून आपल्यावर निवडणूक लढविण्याविषयी दबाव असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हणूनच आता जनता हाच आपला पक्ष मानत आपण निवडणूक असून पक्षाने सांगितले तरी माघार घेणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने निवडणुकीत उडी घेत शैला गोडसे यांनी बंडखोरी केली आहे. ती थोपविण्यासाठी आघाडीचे नेते काय प्रयत्न करतात, त्यानंतरही शैला गोडसे लढणार की माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी तिघांनी अर्ज भरले; बारा अर्जांची विक्री

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या ४ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामध्ये शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्या आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी अपक्ष तर नागेश प्रकाश पवार, एलियास हजीयुसूफ शेख आदी तिघांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. तर अर्ज घेणाऱ्यांमध्ये भगीरथ भालके स्वतःसाठी तर दिलीप कोरके यांनी दिवंगत आ. भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांच्यासाठी अर्ज घेतला आहे. बालाजी सुरवसे यांनी स्वेरीचे बी. पी. रोंगे, संतोष डोंगरे यांनी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासाठी अर्ज घेतला आहे. याशिवाय शीतल आसबे, ॲड. रविकिरण कोळेकर, सुधाकर बंदपट्टे, लक्ष्मण जोमकांबळे, चंद्रकांत क्षीरसागर, ॲड. प्रणेय कांबळे, सुदर्शन मसुरे, बिरुदेव पापरे आदी बारा जणांनी नव्याने उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. शनिवार, रविवार सलग दोन दिवस तर सोमवारी धुलिवंदनानिमित्त सुटी आहे. आता अर्ज भरण्यासाठी केवळ मंगळवार हा एकमेव दिवस उरल्याने त्यादिवशी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपा या प्रमुख पक्षांची तारांबळ उडणार आहे.

फोटो....

२६पंड०१

पंढरपुरात बैलगाडीतून रॅली काढून महापुरुषांना अभिवादन करून अर्ज भरण्यासाठी जात असताना शैला गोडसे.

२६पंड०२

प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना शैला गोडसे

Web Title: Shiv Sena's Shaila Godse revolted and filed her candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.