कुर्डूवाडीत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:03 AM2021-02-20T05:03:21+5:302021-02-20T05:03:21+5:30
येथील नगर परिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन,उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिवस्मारक मंडळ, शिवराय ज्वेलर्स, मावळा प्रतिष्ठान, साम्राज्य आरमार, रणशौर्य ग्रूप, ...
येथील नगर परिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन,उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिवस्मारक मंडळ, शिवराय ज्वेलर्स, मावळा प्रतिष्ठान, साम्राज्य आरमार, रणशौर्य ग्रूप, ओजी ग्रूप, मौलाना आझाद यंग पार्टी चेक नाका, तिरंगा ग्रूप, व टिपू सुलतान ग्रूप यांच्यासह इतर संघटनांंच्याहीवतीने शहरात शिवजयंतीचे आयोजन केले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी न करता कोरोनाची काळजी घेत अनेक मंडळांनी शिवजयंती साजरी केली.
येथील साम्राज्य आरमारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामधे येथील सर्व शिबिराचा रक्तसंकलनाचा रेकॉर्ड मोडून काढत ६४० बाटल्या रक्ताचे संकलन केले. त्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांच्या टीमने परिश्रम घेतले आहे.
तर शिवराय ज्वेलर्सच्या बाबाराजे बागल यांच्यावतीने शहरातल्या सर्व कोरोना योद्धायाचा सन्मान सोहळा साजरा केला. मौलाना आझाद यंग पार्टी चेक नाका यांच्यावतीने उम्मीद मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. शहरात सरबत वाटप करण्यात आले.
कुर्डूवाडी येथील शिवजयंती ही दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते परंतु यंदा प्रथमच कोरोनाच्या नियमांचे पालन करत अगदी साधेपणाने शिवजयंती विविध मंडळांनी साजरी केली.
----
डॉल्बी, मिरवणुकीचा खर्च वाचला पण करमलं नाही
यंदा प्रथमच कुर्डूवाडीतील शिवजयंती उत्सवातला डॉल्बी व मिरवणुकीवरचा लाखो रुपयांचा खर्च वाचला. येथील शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी राज्यातल्या विविध भागातील नागरिकांचा आवर्जून सहभाग असतो. त्यात यंदा प्रथमच खंड पडला आहे. त्यामुळे काही शिवभक्तांना शिवजयंती दिवशी दिवसभर करमले नाही. तरी देखील आपल्या महाराजांना साधेपणाने का होईना विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी येथील विविध मंडळाच्या मूर्तींंकडे डिस्टन्स ठेवून उपस्थिती लावली.
१९कुर्डूवाडी/शिवजयंती
कुर्डूवाडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त साम्राज्य आरमारच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात ६४० जणांनी सहभाग नोंदवला.