शिवाजी अभियांत्रिकीची तंत्रशिक्षण परीक्षेत आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:07+5:302021-09-04T04:27:07+5:30
सांगोला : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा-२०२१ मध्ये शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल ...
सांगोला : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा-२०२१ मध्ये शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका परीक्षेचा निकाल ९८.१८ टक्के लागला.
संगणक विभागातील हरीश धनराज सुगंधी (९७.८९ टक्के) याने प्रथम तर श्रेयश शशिकांत खंडागळे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृप्ती शिवाजी गव्हाणे (९४.११ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका परीक्षेचा निकाल ८५.४७ टक्के लागला. संगणक विभागातील मनाली मोहन बाबर हीने प्रथम (९५.०७ टक्के), तर मृणाली मोहन बाबर हिने द्वितीय (९४.६७ टक्के) क्रमांक मिळवला.
तृतीय क्रमांक इलेक्ट्रॉनिकस अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील पूनम भागवत चौगुले (९२ टक्के) हिने मिळवला. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेचा निकाल ७३ टक्के लागला. संगणक विभागातील धनश्री तानाजी घोडके हिने (८९.३८ टक्के) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील तुषार वसंत मागाडे (८७.२४), तर तृतीय क्रमांक संगणक विभागाची विद्यार्थिनी धनश्री पांडुरंग लेंडवे (८७.१३) हिने मिळवला आहे. २३ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. तसेच १०४ विद्यार्थी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड, विश्वस्त महादेव गायकवाड, संस्थेचे सचिव अंकुशराव गायकवाड, प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख, उपप्राचार्य व्ही. एम. गायकवाड, मार्गदर्शिका एम. व्ही. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.