ज्या शिवतीर्थावर भालकेंनी ठोकला विजयाचा शड्डू; त्याच शिवतीर्थावर ठेवले भालकेंचे पार्थिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:46 PM2020-11-28T12:46:46+5:302020-11-28T12:48:17+5:30

आमदार भारत भालकेंच्या अंत्यदर्शनासाठी पंढरीत शोकाकुल वातावरणात जनसागर लोटला 

The Shivdirtha on which the spear struck the shadow of victory; The earthly body of Bhalke was kept for the last darshan on the same Shivatirtha | ज्या शिवतीर्थावर भालकेंनी ठोकला विजयाचा शड्डू; त्याच शिवतीर्थावर ठेवले भालकेंचे पार्थिव

ज्या शिवतीर्थावर भालकेंनी ठोकला विजयाचा शड्डू; त्याच शिवतीर्थावर ठेवले भालकेंचे पार्थिव

Next

पंढरपूर : सुमारे अकरा वर्ष पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मनावर आधी राज्य केलेल्या लोक नेते आ. भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर शोकाकुल वातावरणात अलोट असा जनसागर लोटला होता. मागील विधानसभा मध्ये विजय मिळाला ज्या शिवतीर्थावर शड्डू ठोकून भारत भालके यांनी नागरिकांना अभिवादन केले होते. त्यांचं शिवतीर्थावर आ. भालके यांचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ पंढरीतील नागरिकांवर आली.

आमदार भारत भालके यांचे २७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव शरीर २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३५ वाजता पुणे येथून सरकोली (ता. पंढरपूर) मार्गस्थ करण्यात आले. 

दरम्यान टेंभुर्णी मार्गे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानावर (गुरसाळे, ता. पंढरपूर) व पंढरपूर शहरातील शिव तीर्थावर भालकेंची पार्थिव असलेली रुग्णवाहिका आणण्यात आली. यावेळी पंढरपुरातील नागरिकांनी आ. भालके यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर भालके यांचे पार्थिव पंढरपूर येथील नगर प्रदक्षिणा मार्गावरून मंगळवेढाकडे मार्गस्थ झाले आहे. 

दुपारी १:३० च्या सुमारास सरकोली येथे  त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी सर्वांसाठी ठेवण्यात येणार आहे.  सरकोली येथेच त्यांच्यावरच सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

यांची राहणार उपस्थिती

आ. भारत भालके यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर,  पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील याच बरोबर शिवसेनेचे मंत्री व आमदार येणार आहे.

Web Title: The Shivdirtha on which the spear struck the shadow of victory; The earthly body of Bhalke was kept for the last darshan on the same Shivatirtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.