पंढरपुरात आज शिवसेनेची महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:19 PM2018-12-24T12:19:41+5:302018-12-24T12:20:36+5:30
सोलापूर : राम मंदिर उभारण्याची मागणी करत अयोध्या दौरा केल्यानंतर आता उद्धव ठाकरे थेट पंढरपुरातून हिंदुत्वाची हाक देतील. त्यांच्या ...
सोलापूर : राम मंदिर उभारण्याची मागणी करत अयोध्या दौरा केल्यानंतर आता उद्धव ठाकरे थेट पंढरपुरातून हिंदुत्वाची हाक देतील. त्यांच्या पंढरपुरात आज सोमवारी होणाºया महासभेसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे़ मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवसैनिकांन मोठया प्रमाणात पंढरपूर शहरात सकाळपासून दाखल होत आहेत.
या सभेसाठी शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आदी नेते सभेच्या नियोजनात आहेत. शिवसेनेच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांसह प्रभू रामचंद्रांचीही भव्य प्रतिमा लावण्यात येईल. सभेसाठी २७ एकरांवरील चंद्रभागा मैदानावर तयारी झाली आहे.
शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटल्याने भाजपालाही त्यावर भूमिका घेणे भाग पडले. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक भाषणे केली. मात्र, हातची तीन राज्ये गेल्यावर हिंदुत्वाची भाषा कायम ठेवायची की सोडायची, अशा कात्रीत भाजपा नेतृत्व आहे.