सोलापूर महापालिका आयुक्तांना धक्का, एन.के.पाटील यांचा कार्यमुक्तीचा आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:59 PM2021-11-23T12:59:04+5:302021-11-23T12:59:07+5:30

नगरविकास खात्याचे आदेश - तत्काळ रुजू करण्यासही कळविले

Shock to Solapur Municipal Commissioner, NK Patil's dismissal order canceled | सोलापूर महापालिका आयुक्तांना धक्का, एन.के.पाटील यांचा कार्यमुक्तीचा आदेश रद्द

सोलापूर महापालिका आयुक्तांना धक्का, एन.के.पाटील यांचा कार्यमुक्तीचा आदेश रद्द

Next

सोलापूर -महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपायुक्त एन.के. पाटील यांना अकार्यक्षम ठरवून कार्यमुक्त केले होते. यावर ताशेरे ओढत नगरविकास खात्याने सोमवारी हा आदेश रद्द केला. पाटील यांना तत्काळ रुजू करुन घेण्यासही कळविले.

उपायुक्त एन.के. पाटील जून २०२१ मध्ये पालिकेत रुजू झाले होते. आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांच्याकडे भूमी मालमत्ता, कर आकारणी सामान्य प्रशासन यासह विविध कामांची जबाबदारी सोपविली होती. या विभागांच्या कामात पाटील यांनी निष्काळजीपणा केला. नोटीसांना समाधानकारक खुलासा केला नाही यासह विविध कारणे देऊन आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त केले होते. पाटील यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्तावही ठेवला होता. आयुक्तांचा हा निर्णय एकतर्फी असून वैयक्तिक वादातून हा निर्णय घेतल्याचा आरोप एन.के.पाटील यांनी केला होता.

पाटील यांनी याबद्दल नगरविकास खात्याकडे तक्रार केली. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पाटील यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी शासनाची पूर्व सहमती घेणे अथवा शासनास त्यांच्याबाबत अहवाल पाठवून त्यांची अन्यत्र पदस्थापना करण्याची विनंती करणे उचित ठरले असते. शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे कोणतेही अधिकार आयुक्तांना नाहीत. कोणतेही नियम नमूद न करता तुम्ही काढलेले आदेश रद्द करण्यात येत आहेत. पाटील यांना तत्काळ कामावर रुजू करुन घ्यावे. अहवाल शासनास तत्काळ पाठवावा, असे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी वि.ना.धाईजे यांनी दिले आहेत.

Web Title: Shock to Solapur Municipal Commissioner, NK Patil's dismissal order canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.