रूपनवर यांच्या नियुक्तीमुळे जल्लोष

By Admin | Published: June 8, 2014 12:52 AM2014-06-08T00:52:58+5:302014-06-08T00:52:58+5:30

विधानपरिषद: माळशिरस तालुक्यात आतषबाजी

Shocked by the appointment of Rupnawar | रूपनवर यांच्या नियुक्तीमुळे जल्लोष

रूपनवर यांच्या नियुक्तीमुळे जल्लोष

googlenewsNext

नातेपुते : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. रामहरी रूपनवर यांची कॉँग्रेसतर्फे विधानपरिषद राज्यपाल नियुक्त आमदारपदी नियुक्ती झाली आहे. विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागांपैकी चार जागांची यादी कॉँग्रेसने राज्यपाल के. शंकरनारायणन यांना देऊन स्वाक्षरी करून यादी मंजूर केली. राज्यपालांनी मंजुरी दिलेल्या नावांमध्ये अ‍ॅड. रामहरी रूपनवर (माळशिरस), आनंदराव पाटील (सातारा), हुस्रबानो खलीपा (रत्नागिरी), जनार्दन चांदूरकर (मुंबई) यांचा समावेश आहे. आणखी दोन नावे अद्याप जाहीर झाली नाहीत. या निवडीबद्दल माळशिरस तालुक्यातील मान्यवरांकडून स्वागत होत आहे.
अ‍ॅड. आर. जी. रूपनवर यांनी जि. प. सदस्य म्हणून सन १९९७ ते २००७ पर्यंत दहा वर्षे काम पाहिले आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, सोलापूर जिल्हा कॉँग्रेस कमिटी, विकास सोसायटी अध्यक्ष १० वर्षे, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ संचालक १० वर्षे, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी मुंबई चिटणीस, अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार अन्याय निवारण कृती समिती, ४४ फाटा शेतकरी अन्याय निवारण संघर्ष समिती व विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले आहे.
अ‍ॅड. रामहरी रूपनवर यांनी अहिल्या संदेश नियोजन रथयात्रा नियोजन, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचे सहायक निरीक्षक म्हणून काम, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेतले. १५ मार्च २०१४ रोजी सेवाग्राम, वर्धा येथील झेंडा मार्च कार्यक्रमात झेंडा मार्च प्रमुख म्हणून काम पाहिले.
याशिवाय उपसरपंच अतुल पाटील, अ‍ॅड. बी. वाय. राऊत, अ‍ॅड. एस. बी. पाटील यांनी रुपनवर यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
----------------------------------------
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपल्याला काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहोत़ आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू़
- अ‍ॅड. रामहरी रूपनवर
नूतन निधानपरिषद सदस्य
----------------------------------------
अ‍ॅड. रुपनवर यांची निवड तालुक्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे़ नातेपुतेच्या इतिहासात प्रथमच अ‍ॅड. आर. जी. रूपनवर यांच्यामुळे आमदारकी मिळाली असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान आहे़
- बाबाराजे देशमुख
जि. प. सदस्य
------------------------------
पक्ष संघटनेत केलेल्या कामाची योग्य दखल नेतृत्वाने घेतल्याचे दिसून येते़ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठतेचे फळ अ‍ॅड. रूपनवर यांना आमदारकीच्या रूपाने मिळाले असे म्हणता येईल़
- अमरशील देशमुख
सरपंच नातेपुते

Web Title: Shocked by the appointment of Rupnawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.