धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू
By Appasaheb.patil | Published: September 15, 2022 06:34 PM2022-09-15T18:34:40+5:302022-09-15T18:34:45+5:30
लोकमत न्युज नेटवर्क
सोलापूर : राज्यात सर्वत्र स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून सोलापूर महानगरपालिकेतर्फे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ सप्टेंबर २०२२ रोजी रोजी कोविड कंट्रोल रूम येथे स्वाईन फ्लू लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.
या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचे हस्ते करण्यात आले . शहरामध्ये आजपर्यंत एकूण ७५ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले असून यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत गरोदर माता, सहव्याधी असलेले नागरिक तसेच आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अशा एकूण २२०० लोकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.माननीय आयुक्त यांनी ही लस महापालिका कार्यक्षेत्रातील १५नागरी आरोग्य केंद्रे व ७ प्रसूती ग्रह यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे ,तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
या शिबिरामध्ये एकूण ८६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले . यात प्रामुख्याने ५० वर्षावरील ५७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली यात उच्च रक्तदाबाचे १८ मधुमेहाचे ९, कर्करोग १ व इतर आजार एक यांचा समावेश आहे.ही शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, डॉ.शिरशेट्टी आणि कुटुंब कल्याण कार्यालया कडील सर्व कर्मचारी आणि देगाव नागरी आरोग्य केंद्रा कडील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्रकर व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.