धक्कादायक; सोलापुरात एकाच दिवशी ८ रुग्णांचा मृत्यू; १४ जणांचा 'कोरोना'अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:39 PM2020-05-30T21:39:41+5:302020-05-30T21:41:53+5:30

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या झाली ८६५; आतापर्यंत ४०२ जणांवर उपचार सुरू

Shocking; 8 patients die on the same day in Solapur; Corona report of 14 people is positive | धक्कादायक; सोलापुरात एकाच दिवशी ८ रुग्णांचा मृत्यू; १४ जणांचा 'कोरोना'अहवाल पॉझिटिव्ह

धक्कादायक; सोलापुरात एकाच दिवशी ८ रुग्णांचा मृत्यू; १४ जणांचा 'कोरोना'अहवाल पॉझिटिव्ह

Next

सोलापूर :  सोलापुरातील पॉझिटिव्ह 'कोरोना' बाधितांची संख्या तीन वाढतच आहे. शनिवारी एका दिवसात २३० जणांचे अहवाल प्राप्त झाले यात २१६ निगेटिव्ह तर १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज मृतांची संख्या ८ इतकी असून सोलापुरातील एकूण मृतांची संख्या ८३ झाली आहे.

आत्तापर्यंत सोलापूरात ७७०७ जणांची कोरोना चाचणी झाली असून ७०३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. ६७१ अहवाल प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत निगेटिव्ह ६१७१ अहवाल आले तर पॉझिटिव्ह अहवाल ८६५ झाले आहेत. आज रूग्णालयातून २९ जणांना घरी सोडण्यात आलं. यामुळं बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३८० झाली आहे तर ४०२ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

आज मृत खालीलप्रमाणे....

  • गांधी नगर अ.कोट रोड ४५ वर्षीय पुरूष.
  • नरसिंह नगर मोदी ६१ वर्षीय महिला.
  • भवानी पेठ परिसर ७२ वर्षीय पुरूष.
  • अवंतीनगर परिसर ६९ वर्षीय महिला.
  • जुना विडी घरकुल परिसर ६७ वर्षीय पुरूष.
  • बाळीवेस परिसर ६२ वर्षीय महिला.
  • उत्तर कसबा परिसर ६१ वर्षीय पुरूष.
  • वेणुगोपाल नगर ४१ वर्षीय पुरूष.

आज जे रूग्ण मिळाले त्यांची ठिकाणे पुढीलप्रमाणे

  • उत्तर कसबा २ पुरूष.
  • मरीआई चौक दमाणी नगर १ महिला.
  • सरवदे नगर १ पुरूष.
  • गांधी नगर अ.कोट रोड १ पुरूष.
  • बुधवार पेठ १ महिला.
  • जुना विडी घरकुल २ पुरूष, १ महिला.
  • आंध्र तालीम लष्कर १ पुरूष.
  • मोदी १ महिला.
  • कुमठा नाका १ महिला.
  • अंबिका नगर १ पुरूष.
  • निलमनगर १ पुरूष.

Web Title: Shocking; 8 patients die on the same day in Solapur; Corona report of 14 people is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.