धक्कादायक; मटका बुकी मालकाच्या त्रासाला कंटाळून मटका एजंटाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 10:52 AM2022-10-29T10:52:06+5:302022-10-29T10:53:06+5:30
पंढरपुरातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंढरपूर : मटका बुकी मालकाच्या त्रासाला कंटाळून मटका एजंटाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑक्टोंबर रोजी राझंणी (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. महेश साहेबराव उमाप (वय ४०, रा. पळसखेडा, ता. केज, जि. बीड) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पत्नी मुला बाळासह खेड (पुणे) या गावी विभक्त राहत होता. महेश मटका एजंट म्हणुन काम करत होता. महेशचे वडील साहेबराव उमाप (वय ६८, रा. पळसखेडा, ता. केज, जि. बीड) हे महेश याचेकडे अधुनमधुन भेटण्यासाठी येत जात होतो. त्या दरम्यान माझा मुलगा महेश याने त्याचा मित्र बिभिषन राजाराम सुरवसे (रा. आंबे, ता. पंढरपूर) याची माझ्या बरोबर ओळख करून दिलेली होती. रांझणी (ता. पंढरपूर) या गावी मटका बुकी मालक योगेश अशोक दांडगे याचा मटका जुगार व्यवसाय चालु आहे. तु ये असा निरोप बिभिषण सुरवसे याने मला दिला आहे. मी बिभिषन कामास असलेल्या रांझणी गावी आलो आहे असे फोनवरून महेशने त्यांच्या वडील साहेबराव उमाप यांना १४ ऑगस्ट २०२२ रोजी कळविले होते. तसेच योगेश अशोक दांडगे यांचेकडे कामाला लागलो आहे. मला बिभिषन ने कामाला लावले आहे असे सांगितले होते. त्यानंतर मटका बुकी मालक यांच्याकडुन ७ हजार रुपयांची उचल घेतली होती. या रक्कमेसाठी ते वारंवार शिवीगाळ करून त्रास देत असल्याची माहिती महेश साहेबराव यांना १२ ऑक्टोंबर रोजी दोन वेळा फोनद्वारे कळविली होती. १३ ऑक्टोंबर रोजी महेश याने पंख्याला दोरी लावुन गळफास घेतल्याचे बिभीषण राजाराम सुरवसे याने साहेबराव यांना सांगितले. महेशचे वडील साहेबराव उमाप यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.