धक्कादायक...! लग्नाआधीच होणाऱ्या नवरोबानं केला अत्याचार; ...तर लग्न मोडण्याची दिली धमकी, पिडितेची फिर्याद
By विलास जळकोटकर | Updated: June 26, 2024 19:20 IST2024-06-26T19:18:56+5:302024-06-26T19:20:13+5:30
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित फिर्यादीचे नमूद आरोपीशी लग्न जमले होते. २६ मे रोजी पिडितेच्या घरातील मंडळी पाहुण्यांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने बारेगावी गेले होते.

धक्कादायक...! लग्नाआधीच होणाऱ्या नवरोबानं केला अत्याचार; ...तर लग्न मोडण्याची दिली धमकी, पिडितेची फिर्याद
सोलापूर : सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या लग्न जमलेल्या कुमारिकेशी तिच्या होणाऱ्या नवरोबानं लग्न मोडण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना सोलापूर-पुणे हायवेवरील एका लॉजवर घडली. या प्रकरणी पिडितेने धाडस बुधवारी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदला आहे. मोईनअली शब्बीर मुजावर असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित फिर्यादीचे नमूद आरोपीशी लग्न जमले होते. २६ मे रोजी पिडितेच्या घरातील मंडळी पाहुण्यांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने बारेगावी गेले होते. लग्न जमलेल्या नमूद आरोपीने पिडितेला भेटण्यासाठी बोलावले. पिडितेने नकार दिल्याने त्याने खोटेनाटे आरोप केले. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून लग्न मोडण्याची धमकी दिली.
अखेर पिडिता तयार होऊन नमूद आरोपीसोबत दुचाकीवर हायवेवरील एका लॉज कम हॉटेलमध्ये नेले. तेथे रुमचे दार बंद करताना पिडितेेने नकार दिला असता तिला चापटा मारुन जबरदस्तीने शिवीगाळ करुन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात पिडितेने धाव घेऊन फिर्याद दिली असता आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ३७६ अन्वये गुन्हा नोंदला आहे. तपास सपोनि काटे तपास करीत आहेत.