धक्कादायक; केसपेपर काढणारी बोरामणीची परिचारिका उस्मानाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 02:00 PM2020-06-15T14:00:51+5:302020-06-15T14:02:24+5:30
सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाचे वाढले टेन्शन; आता इतर कर्मचाºयांची तपासणी होणार
बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर येथील रुग्णांची तपासणी अपेक्षित होते. याबाबत संबंधित परिचारिकेने तक्रार केल्यावर येथील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये तपासणी करण्यात आली, पण तिचा अहवाल निगेटिव्ह आला. संबंधित परिचारिका तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील रहिवासी आहे. गावाकडे गेल्यावर तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे ती उपचारासाठी तुळजापूर येथील रुग्णालयात दाखल झाली. १३ जून रोजी तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर रविवारी प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.
याबाबतची माहिती मिळताच सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. बोरामणी आरोग्य केंद्रात त्या परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या कर्मचाºयांचा आता शोध सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले.
त्या परिचारिकेला केसपेपर काढण्याची ड्युटी होती. या अनुषंगाने जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य केंद्रात आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातून तिला बाधा झाली असावी असे आरोग्य कर्मचाºयांचे म्हणणे आहे. कर्मचाºयांना सुरक्षा साहित्य पुरविण्यात आल्याने असा धोका वाढल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.